Goa Summer Temperature Dainik Gomantak
गोवा

गोव्यात बीचवर उन्हाचा त्रास होतोय का? नेटकरी पर्यटकाला म्हणाले, 'शॅकमध्ये बसून रहा आणि थंड पेय पी'; वाचा धमाल कमेंट्स

Goa Summer Temperature: गोव्याला पुढील आठवड्यात भेट देणार असल्याची माहिती देत एका व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट केली आणि तेथील हवामानाबाबत चिंता व्यक्त केली.

Sameer Panditrao

पणजी: गोव्यातील वाढत्या उष्णतेबाबत सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. गोव्याला पुढील आठवड्यात भेट देणार असल्याची माहिती देत एका व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट केली आणि तेथील हवामानाबाबत चिंता व्यक्त केली. “मी पुढच्या आठवड्यात गोव्याला येत आहे. तिथे खूप उष्णता असते असे ऐकले आहे. सध्या हवामान कसे आहे? बीचवर जाणे शक्य आहे का?” असा प्रश्न त्याने नेटकऱ्यांना विचारला.

या पोस्टनंतर काही वेळातच नेटकऱ्यांनी कमेंटचा अक्षरशः पाऊस पाडला. अनेकांनी आपल्या अनुभवांवरून गोव्याच्या सध्याच्या हवामानाबाबत प्रतिक्रिया दिल्या. काहींनी उष्णतेबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला, तर काहींनी हलक्या-फुलक्या शैलीत परिस्थितीचे वर्णन केले.

एका युजरने “तू काळजी केलीच पाहिजेस” अशी टिप्पणी करत गोव्यातील वाढत्या उकाड्याचा इशारा दिला.

तर दुसऱ्या एका व्यक्तीने विनोदी शैलीत प्रतिक्रिया देताना “दुपारी तीन वाजता मला तर अक्षरशः शिजल्यासारखे वाटते” असे लिहिले. ही कमेंट पाहून अनेकांनी त्यावर हसत-हसत प्रतिक्रिया दिल्या. काही नेटकऱ्यांनी मात्र व्यवहार्य सल्ले दिले. “सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत बाहेर पडू नकोस,” असा सल्ला काहींनी दिला.

या वेळेत उन्हाची तीव्रता अधिक असल्याने बीचवर जाणे टाळावे, असेही काहींनी नमूद केले. तर एका युजरने मजेशीर पण अर्थपूर्ण सल्ला देताना “बीचवरील शॅकमध्ये बसूनच थंड पेयांचा आनंद घ्या आणि शॅक सोडून बाहेर पडूच नका,” असे लिहिले.

गोव्यातील वाढत्या तापमानामुळे स्थानिक आणि पर्यटक दोघांनाही उष्णतेचा त्रास होत असल्याची चर्चा या पोस्टच्या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आली आहे. सोशल मीडियावर सुरू झालेली ही चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक जण त्यावर आपापले अनुभव आणि सल्ले शेअर करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अस्नोड्यात ओव्हरटेकिंगच्या वादातून राडा; दुचाकीस्वाराला बेदम मारहाण! भररस्त्यात घडलेला थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Nepal Jeep Accident: नेपाळमध्ये भीषण अपघात! भाविकांची जीप 700 मीटर खोल दरीत कोसळली; 20 जणांचा जागीच मृत्यू

Goa Karnataka Island Dispute: गोव्याने आपली हक्काची बेटे कशी गमावली?

संयुक्त अरब जागृती! - संपादकीय

US Iran War: अखेर युद्ध थांबलं! ट्रम्प प्रशासनाची मोठी घोषणा, पण घातली 'ही' कडक अट

SCROLL FOR NEXT