पाकिस्तानात प्रेम, लग्न अन् भारतात राहून हेरगिरी, एनआयएने जफर रियाजला ठोकल्या बेड्या; आयएसआयचा निघाला हस्तक

Pakistan Backed Espionage Network Busted: देशाच्या सुरक्षा यंत्रणांना एक मोठे यश मिळाले असून त्यांनी पाकिस्तान समर्थित हेरगिरी नेटवर्कशी जोडलेल्या एका मुख्य आरोपीला अटक केली.
Security agencies arrest suspect linked to Pakistan ISI
Security agencies arrest suspect linked to Pakistan ISIDainik Gomantak
Published on
Updated on

NIA Arrests Jafar Riaz Kolkata: देशाच्या सुरक्षा यंत्रणांना एक मोठे यश मिळाले असून त्यांनी पाकिस्तान समर्थित हेरगिरी नेटवर्कशी जोडलेल्या एका मुख्य आरोपीला अटक केली. कोलकाता येथील रहिवासी असलेल्या जफर रियाज उर्फ रिझवी याला एनआयएने देशविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याच्या आणि भारताची अत्यंत संवेदनशील व गोपनीय माहिती पाकिस्तानी गुप्तहेर संघटनांच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्याच्या आरोपाखाली बेड्या ठोकल्या. या अटकेमुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेला असणारा एक मोठा धोका टळला असून पाकिस्तानी गुप्तचरांचे जाळे उद्ध्वस्त करण्यात यंत्रणांना यश आले.

एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, जफर रियाजने एका पाकिस्तानी महिलेशी लग्न केले होते आणि त्याची मुलेही पाकिस्तानची नागरिक आहेत. 2005 पासून तो भारत आणि पाकिस्तान दरम्यान अनेकदा प्रवास करत होता. याच प्रवासादरम्यान तो पाकिस्तानी गुप्तहेर एजंट्सच्या संपर्कात आला आणि त्यांनी त्याला पैशांचे आमिष दाखवून तसेच पाकिस्तानचे (Pakistan) नागरिकत्व देण्याचे आश्वासन देऊन आपल्या जाळ्यात ओढले.

Security agencies arrest suspect linked to Pakistan ISI
NIA Raids: अल-कायदाच्या कटाचा पर्दाफाश! NIA ची 5 राज्यांमध्ये छापेमारी; बांगलादेशी घुसखोरांच्या मदतीने गुजरातमध्ये दहशतवादी कारवायांचे षडयंत्र

यानंतर त्याला भारताच्या विरोधात हेरगिरीच्या कामात गुंतवण्यात आले. तपासात समोर आले की, आरोपी जफरने पाकिस्तानी अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी भारतीय मोबाईल नंबरचे वन-टाइम पासवर्ड शेअर केले होते. या ओटीपीच्या मदतीने पाकिस्तानातून भारतीय नंबरवर व्हॉट्सॲप अकाउंट्स सक्रिय करण्यात आले, जेणेकरुन संशयास्पद कारवाया करताना त्यांची खरी ओळख लपवता येईल.

Security agencies arrest suspect linked to Pakistan ISI
Mumbai Airport: मोठी बातमी! मुंबई विमानतळावर आयसिसच्या 2 दहशतवाद्यांना अटक, NIA ची मोठी कारवाई; 3 लाखांचे इनाम, 2 वर्षे होते फरार

पाकिस्तानी गुप्तहेर अधिकारी याच व्हॉट्सॲप अकाउंट्सचा वापर करुन 'मोतीराम जाट' नावाच्या दुसऱ्या एका आरोपीच्या संपर्कात होते. मोतीराम जाट याच्यावरही भारताच्या सुरक्षेविषयीची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीच लुकआउट सर्कुलर जारी करण्यात आले. विशेष म्हणजे, जफर रियाज हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही एका हेरगिरीच्या प्रकरणात त्याला अधिकृत गुप्तता कायदा आणि आयपीसी अंतर्गत दोषी ठरवण्यात आले होते. तरीही तो पुन्हा पाकिस्तान समर्थित नेटवर्कच्या संपर्कात आला.

Security agencies arrest suspect linked to Pakistan ISI
Terror Funding Case: पाक समर्थित दहशतवादी संघटनांवर NIA ची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये 9 ठिकाणी छापेमारी

एनआयएने (NIA) या आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, अधिकृत गुप्तता कायदा आणि बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. हा तपास केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून, या आंतरराष्ट्रीय हेरगिरी नेटवर्कचे धागेदोरे, विदेशी कनेक्शन आणि दहशतवादी कटाच्या इतर पैलूंचा शोध घेण्यासाठी एनआयएचे पथक सखोल तपास करत आहे. येत्या काळात या प्रकरणात अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com