Goa Rain Update Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: ..परत पावसाचे टेन्शन! वेधशाळेने दिला 'यलो अलर्ट'; गोव्यात कोसळणार जोरदार सरी

Goa Rain Update: गेल्या काही दिवसांपासून गोवा राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र येत्‍या गुरुवारपासून (ता. २५) पुढील चार दिवस पावसाच्या जोरदार सरी कोसळतील.

Sameer Panditrao

मुख्य मुद्दे:

१. येत्‍या गुरुवारपासून गोव्यात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला.
२. मागील २४ तासांत केवळ १.८ मि.मी. पावसाची नोंद; कडकडीत उन्हामुळे नागरिक प्रभावित.
३. नवरात्र उत्सव आणि पर्यटकांसाठी येणाऱ्या पावसामुळे वातावरणात गोंधळ आणि संभाव्य अडचणी.

गेल्या काही दिवसांपासून गोवा राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र येत्‍या गुरुवारपासून (ता. २५) पुढील चार दिवस पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज गोवा वेधशाळेने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्यभर ‘यलो अलर्ट’ जारी केला असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना केली आहे.

मागील २४ तासांत राज्यात केवळ १.८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, त्यामुळे लोकांना कडकडीत उन्हाचा सामना करावा लागला आहे. अचानक पडलेल्या उन्हाने नागरिक हैराण झाले आहेत. पण पुन्हा पावसाचा इशारा दिल्याने गोंधळाचे वातावरण आहे.

शेजारच्या महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. अलीकडेच गणेश उत्सवापर्यंत पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर बऱ्यापैकी उघडीप होती. सततच्या वातावरण बदलामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढली आहे.

सध्या नवरात्र उत्सव सुरु आहे. नुकताच पाऊस कमी असल्याने राज्यात वातावरण उत्साही होते. पर्यटक येण्यास सुरुवात झाली होती. पण आता वेधशाळेने नुकताच वर्तवलेल्या अंदाजानुसार मुसळधार पावसाची शक्यता आहे. याचा फटका पर्यटकांना, व्यावसायिकांना बसणार आहे.

FAQs

प्रश्न १: गोव्यात येणाऱ्या पावसाची तीव्रता किती असेल?
उत्तर: गोवा वेधशाळेच्या अंदाजानुसार येत्‍या चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

प्रश्न २: यलो अलर्ट म्हणजे काय?
उत्तर: यलो अलर्ट म्हणजे पावसामुळे काहीसा धोका असू शकतो, परंतु अत्यंत गंभीर परिस्थिती नाही. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.

प्रश्न ३: पर्यटकांना पावसामुळे काय काळजी घ्यावी लागेल?
उत्तर: पर्यटकांनी घराबाहेर जाणे टाळावे, पावसाळी तयारी ठेवावी, आणि पावसापासून संरक्षणासाठी योग्य कपडे वापरावे.

प्रश्न ४: शेजारच्या राज्यांवर पावसाचा प्रभाव होणार आहे का?
उत्तर: हो, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रवाशांनी वाहतूक आणि योजना याबाबत खबरदारी घ्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT