Goa Rain: गोव्यात पावसाची दमदार वापसी! विजांचा कडकडाट, पुढील तीन दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी

Goa Rain Yellow Alert: पुढील तीन दिवसांसाठी राज्यात 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला असून शनिवारी दुपारपासूनच अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली
IMD alerts in Goa
IMD alerts in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: हवामान खात्याने गोव्यात शनिवार म्हणजे दिनांक १३ ते सोमवर १५ सप्टेंबरपर्यंत, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे पुढील तीन दिवसांसाठी राज्यात 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला असून शनिवारी दुपारपासूनच राज्यातील अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वातावरणात असलेली उष्मा कमी होऊन सुखद गारवा निर्माण झाला.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील सहा दिवसांत राज्यातील कमाल तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तसेच, १६ ते १९ सप्टेंबर दरम्यानही राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शनिवारी पणजीमध्ये कमाल तापमान ३१ अंश, तर किमान २५.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मुरगावमध्येही कमाल तापमान ३१ अंश, तर किमान तापमान २५.६ अंश सेल्सिअस राहिले.

IMD alerts in Goa
Goa Rain: 3 दिवस पावसाचा इशारा! मध्यम सरी कोसळणार; राज्यात 'यलो अलर्ट' जारी

सरासरीपेक्षा ३.६ टक्के अधिक पाऊस

या वर्षी, १ जून ते १३ सप्टेंबर या कालावधीत गोव्यात सरासरी ११६.०५ इंच पावसाची नोंद झाली आहे. ही आकडेवारी राज्याच्या सरासरी पावसापेक्षा ३.६ टक्क्यांनी अधिक आहे.

तालुक्यांनुसार पावसाची आकडेवारी (इंच):

सांगे: १५३.७२

धारबांदोडा: १५१.५८

वाळपई: १५०

केपे: १४१.८०

फोंडा: १२३.७३

साखळी: ११९.२८

पेडणे: ११३.५०

काणकोण: १११.७५

जुने गोवे: ११०.०६

म्हापसा: ९८

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com