Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: गोवेकरांना मिळणार उकाड्यापासून दिलासा! अवकाळी पावसाचा 'यलो अलर्ट' जारी

Rain Alert In Goa: राज्यात ६ आणि ७ मे २०२५ रोजी वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, हवामान खात्याने यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

Sameer Amunekar

IMD Goa Weather Update

पणजी: राज्यात ६ आणि ७ मे २०२५ रोजी वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, हवामान खात्याने यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात राज्यातील विविध भागांत ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी गडगडाटासह पावसाचीही नोंद होऊ शकते.

राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत असून, याचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि शेतीवर दिसून येत आहे.

एकीकडे तापमान वाढून उकाडा जाणवतो आहे, तर दुसरीकडे अचानक पावसाचे सत्र सुरू होते. यामुळे शेतकरी, बागायतदार आणि सामान्य नागरिक प्रचंड चिंतेत आहेत.

हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, गोव्यात पुढील दोन दिवसांत पावसाचे प्रमाण काही प्रमाणात वाढू शकते. या अस्थिर हवामानाचा सर्वाधिक फटका फळबागांना बसू शकतो. आंबा, काजू आणि अन्य हंगामी फळपिके यावर या पावसाचा परिणाम होण्याची भीती आहे.

हवामानातील सततच्या बदलामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. नागरिकांनी सतर्क राहून अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन स्थानिक प्रशासन आणि हवामान खात्याने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT