Sameer Panditrao
चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे व्यवसाय कसा होईल, अशी चिंता दुकाने थाटलेल्या अनेकांना भेडसावत आहे. त्यामुळे काही हॉटेल्सवाल्यांनी आपला गाशा गुंडाळणे सुरू केले होते.
चेंगराचेंगरीनंतर धोंड हाती धारण करत असलेल्या वेताच्या सजवलेल्या काठ्या यांच्या अंगणात अशा फेकण्यात आल्या आहेत.
श्री देवी लईराई देवीच्या मंदिरात गर्दी नव्हती. एरव्ही दर्शनासाठी लागणारी रांग दिसली नाही.
होमकुंड परिसरातून भस्म नेण्यासाठी एरव्ही गर्दी होत असते. चेंगराचेंगरीनंतर साऱ्यांनी काढता पाय घेतल्याने शनिवारी दुपारी होमकुंड परिसरात शुकशुकाट होता.
या परिसरापासून दोनशे मीटरवर दुर्घटना झाली होती. बंद दुकानेच त्या परिसरात काही अघटित घडले होते याची साक्ष देत होती.
जत्रेतील गर्दीची महती ऐकून महाराष्ट्रातून भांडी विक्री करण्यासाठी आलेल्या या महिला शनिवारी आता कसे होणार याची चिंता आपल्या भाषेत व्यक्त करताना दिसून आल्या.
वाहनतळ असा मोकळा होता. त्यामुळे भाविक मंदिरात आले होते की नाही याचे उत्तर या छायाचित्रातून मिळते.