Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: राज्यात पुढील 3 तासांत मुसळधार पावसाची शक्यता; आंबा, काजू बागायतदार चिंतेत

Goa Rain Alert: गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. अचानक पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे नागरिक आणि शेतकरी दोघेही हैराण झाले आहेत.

Sameer Amunekar

पणजी: गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. अचानक पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे नागरिक आणि शेतकरी दोघेही हैराण झाले आहेत. भारतीय हवामान खात्याने गोवा राज्यासाठी पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार, येत्या १ ते ३ तासांच्या कालावधीत उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांतील काही भागांमध्ये जोरदार मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मार्च ते मे या कालावधीत गोव्यात काजू आणि आंबा ही दोन महत्त्वाची हंगामी फळपिके घेतली जातात. यंदा देखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात काजू व आंब्याचे उत्पादन घेण्यासाठी मेहनत घेतली आहे. मात्र, हवामानातील अनपेक्षित बदलांमुळे या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात मागील काही आठवड्यांपासून हवामानात सातत्यानं बदल होत आहेत. एखाद्या दिवशी अवकाळी पाऊस पडतो, तर दुसऱ्या दिवशी तीव्र उष्णतेची लाट जाणवते. या बदलत्या हवामानामुळे शेती आणि बागायतीवर मोठा परिणाम होत आहे.

काही दिवसांपूर्वी पेडणे, सत्तरी, केपे आणि काणकोण या भागांत जोरदार पावसाचा अनुभव आला होता. त्या वेळी अनेक भागांत झाडे कोसळली होती, काही झाडे थेट विजेच्या तारांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT