Goa weather alert Dainik Gomantak
गोवा

Goa weather alert: राज्यात उन्हाचा तडाखा वाढला! रात्रीचा पाराही चढला; पुढील काही दिवस उष्म्यातून सुटका नाही

Goa Weather Update: राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असून असह्य उष्म्याने नागरिक हैराण आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असून असह्य उष्म्याने नागरिक हैराण आहे. मागील चार पाच दिवसांपासून तर दिवसासोबत रात्री देखील घामाने अंगाची लाही-लाही होत असून पुढील चार पाच दिवस अशीच स्थिती राहणार आहे. दिवसासोबत रात्रीही उष्म्याने होरपळून निघणार आहे.

गोवा वेधशाळेने कमाल तापमानाचा पार ३६ अंश त्यासोबतच किमान तापमानाचा पारा २८ अंशांपर्यंत राहणार असून दिवसा सोबतच रात्रीही मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वाढलेल्या उष्म्यात नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले असून शक्यतो दुपारी १२ ते ४ वा.च्या दरम्यान घराबाहेर पडू नये, त्यासोबतच रात्री झोपण्याच्या जागी गारवा असेल याची खबरदारी घ्यावी. पंखा किंवा वातानुकूलन सेवेचा वापर करावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

आर्द्रता ८० टक्के!

कमाल ३६.२ अंश सेल्सिअस तर किमान २८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. सामान्य तापमानाच्या तुलनेत २ अंशाहून अधिक तापमानाची नोंद करण्यात आली. आर्द्रता ८० टक्के पोचली होती. पुढील दोन दिवस राज्यातील काही भागात तुरळक पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

ढगाळ वातावरण

राज्यात मागील दोन-तीन दिवसांपासून सकाळपासून ढगाळ वातावरण तयार होत आहे. आर्द्रता वाढल्यामुळे असह्य उष्मा जाणवत आहे. दुपारी सूर्य माथ्यावर आल्यावर अक्षरशः घामाने अंघोळ केल्यासारखी होत असून पंखा किंवा एसीशिवाय राहणेच शक्य होत नाही. रात्रीची देखील अवस्था अशीच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT