Goa Accident Death: कंटेनरच्या चाकाखाली संसाराचा चुराडा, बोरी येथील अपघातात महिलेचा मृत्यू; पती किरकोळ जखमी

Ponda Margao highway accident: फोंडा - मडगाव महामार्गावरील टॉपकोला - बोरी येथे कंटेनर आणि दुचाकीच्या अपघातात बेतकी - बोरी येथील मोहिनी तुकाराम नाईक (वय ५५ वर्षे) ही महिला जागीच ठार झाली.
Goa Accident Death
Goa Accident DeathDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: फोंडा - मडगाव महामार्गावरील टॉपकोला - बोरी येथे कंटेनर आणि दुचाकीच्या अपघातात बेतकी - बोरी येथील मोहिनी तुकाराम नाईक (वय ५५ वर्षे) ही महिला जागीच ठार झाली. हा अपघात गुरूवारी दुपारी दीडच्या सुमारास घडला. मोहिनी नाईक या पतीसह दुचाकीवरून घरी जात असताना हा भीषण अपघात झाला.

फोंड्याहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या आरजे - १४ जीपी - ५९२१ या क्रमांकाचा अवजड कंटेनर आणि जीए-०५-एन-८७३० या क्रमांकाच्या दुचाकीत हा अपघात झाला. दोन्ही वाहने मडगावच्या दिशेने जात होती.

टॉपकोला - बोरी येथे कंटेनरच्या टायरची धडक दुचाकीला बसल्याने ते दोघे रस्त्यावर कोसळले. त्यावेळी मोहिनी या रस्त्यावर कंटेनरच्या बाजूने पडल्या आणि चाकाखाली आल्या, तर पती तुकाराम नाईक हे रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. सुदैवाने ते किरकोळ जखमांवर बचावले.

Goa Accident Death
Goa Dairy Milk Price: राज्यात दूध दरवाढ अटळ, गोवा डेअरीही दरवाढ करण्याच्या विचाराधीन

कंटेनरचालकाला अटक

अपघात झाला तरी कंटेनरचालकाला त्याची माहितीच नव्हती. शेवटी ‘टॉपकोला’जवळ असलेल्या गृहरक्षकाने साईबाबा मंदिराजवळील गृहरक्षकाला या अपघाताची कल्पना दिली.

यावेळी स्थानिकांनी आणि गृहरक्षकाने ट्रक थांबवला आणि चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. ट्रकचालक राजधर धांदर (वय ४९ वर्षे, रा. भारतपाल - राजस्थान) याला पोलिसांनी अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.

Goa Accident Death
Goa Anjuna Beach: काळे खडक, सुंदर सूर्यास्त आणि धमाकेदार नाईटलाईफ; हणजूण बीचची खासियत काय?

फुले विकून चालायचा उदरनिर्वाह

मोहिनी नाईक या फुलेविक्रेत्या असून पती तुकाराम हे पेंटर म्हणून काम करतात. कन्येचा विवाह करून दिला असून रोजंदारीवर या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा; पण आता पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे तुकाराम नाईक यांच्यावर संकट कोसळले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com