rickshaw ST bus accident Dainik Gomantak
गोवा

Goa Bus Accident: कदंब बसच्या धडकेत 23 वर्षीय तरुणी ठार, एकजण जखमी, वेर्णा येथे भीषण अपघात; चालकाविरोधात गुन्हा दाखल

Kadamba Bus Accident: पणजीहून मडगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कदंब परिवहनच्या बसने समोरुन जाणाऱ्या एका दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. वेर्णा परिसरात हा अपघात झाला.

Manish Jadhav

Kadamba Bus Accident: वेर्णा येथून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. येथे झालेल्या एका भीषण अपघातात 23 वर्षीय तरुणी जागीच ठार झाली, तर दुचाकीवर असलेला अन्य एक व्यक्ती जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पणजीहून मडगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कदंब परिवहनच्या बसने समोरुन जाणाऱ्या एका दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. वेर्णा परिसरात हा अपघात झाला.

अपघातात तरुणीचा दुर्दैवी अंत

बसच्या जोरदार धडकेमुळे दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर खाली पडले. या अपघातात दोघांनाही गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या. स्थानिकांनी आणि अपघातस्थळी जमा झालेल्या लोकांनी तात्काळ दोघांनाही उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवले. परंतु, 23 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिची ओळख अद्याप पटलेली नाही. तर, दुचाकीवर असलेला कुडचडे (Curchorem) येथील अन्य एक व्यक्ती जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

बस चालकावर गुन्हा दाखल

दरम्यान, या अपघातामुळे वेर्णा परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अपघाताची नोंद केली. बस चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवण्यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. वेर्णा पोलिसांनी (Police) याप्रकरणी संबंधित कदंब बस चालकाविरोधात गुन्हा नोंद केला असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND-W vs SL-W: शफाली-ऋचा अपयशी, पण हरमनप्रीत चमकली! चौकार-षटकारांचा पाडला पाऊस; झंझावती खेळीने सावरला टीम इंडियाचा डाव VIDEO

भररस्त्यात टोळक्याकडून शिवीगाळ, महिलेसह कुटुंबावर प्राणघातक हल्ला; सांकवाळ येथील घटनेप्रकरणी वेर्णा पोलिसांकडून चौघांना बेड्या

Rohit- Virat Record: 'रो-को'चा जलवा! 2025 मध्ये विराट-रोहितने गाजवलं मैदान; पाहा वर्षभराचा 'रिपोर्ट कार्ड'!

Goa Crime: सोनं, रोकड अन् महागडे गॅजेट्स... पेडण्यात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 53 लाखांच्या मुद्देमालासह दोघे अटकेत

गोवा सरकारकडून भारतरत्न वाजपेयींना अनोखी श्रद्धांजली; नव्याने निर्माण होणाऱ्या जिल्ह्याचे नामकरण केले 'अटल'

SCROLL FOR NEXT