Goa-Mumbai Private Bus Accident at Kolhapur
Goa-Mumbai Private Bus Accident at KolhapurDainik Gomantak

Goa-Mumbai Bus Accident: गोवा-मुंबई खासगी बसचा कोल्हापुरात अपघात; एकाच कुटूंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Goa-Mumbai Bus Accident: प्रवासी झोपेत असताना मध्यरात्री बस झाली पलटी
Published on

Goa-Mumbai Private Bus Accident at Kolhapur: गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या खासगी बसचा कोल्हापुरात भीषण अपघात झाला आहे. यात एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तिघेही मृत पुण्याचे आहेत. कोल्हापुरातील पुईखडी येथे रात्री सव्वा दोनच्या सुमारास हा अपघात झाला.

बसमध्ये एकूण 25 प्रवासी होते. 16 प्रवासी सुखरूप असल्याचे सांगितले जात आहे. तर जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले

Goa-Mumbai Private Bus Accident at Kolhapur
IFFI 2023: 'इफ्फी'त आज, गुरूवारी काय पाहाल? जाणून घ्या आजचे चित्रपट, संवाद सत्रांविषयी...

व्ही.आर.एल. कंपनीची ही खासगी स्लीपर बस आहे. रात्री सव्वा दोनच्या सुमारास पुईखडी येथील वळणावर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली.

रात्र असल्याने सर्व प्रवासी झोपेत होते. गाडी पलटी झाल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे प्रवाशांचा आरडाओरडा सुरू झाला.

अपघातात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. नीलू गौतम (वय 43), रिधिमा गौतम (वय 17), सार्थक गौतम (वय 13) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण पुण्याचे रहिवाशी आहेत. चार प्रवासी बसखाली अडकले होते.

रात्री उशिरापर्यंत त्यांना बाहेर काढले गेले. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. क्रेनच्या सहाय्याने ही बस पुन्हा रस्त्यावर उभी केली गेली.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच शाहुवाडी येथे गोव्याहून पुण्याकडे जाणारी एक खासगी बस नदीपात्रात पडली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com