Vasco Janata Darbar Dainik Gomantak
गोवा

Vasco Janata Darbar: ''मी दरबारात साष्टांग नमस्कार घालून पाया पडतो''; 'त्यांची' आर्त विनवणी आणि मंत्री झाले निरुत्तर, घडलं असं की...

Vasco Janata Darbar: सोमवारी 4 ऑगष्ट रोजी बायणा वास्कोतील रवींद्र भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Janata Darbar In Vasco Ravindra Bhavan: कोणत्याही प्रकारे मुरगाव बंदरात होणारी कोळसा हाताळणी बंद करा.

पाहिजे तर मी तुम्हाला जनता दरबारात साष्टांग नमस्कार घालून पाया पडतो, अशी आर्त विनवणी सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांना आज रवींद्र भवन बायणा येथे झालेल्या जनता दरबारात केली. कोळसा प्रश्नी मंत्री सुदिन ढवळीकर निरुत्तर राहिले.

गोवा सरकारने लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी जनता दरबार या कार्यक्रमाची सुरुवात केली असून, आज सोमवारी ४ ऑगष्ट रोजी बायणा वास्कोतील रवींद्र भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी उपस्थित मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासमोर कोळसा प्रश्न उपस्थित करून त्यांना कोळसाविषयी विविध प्रश्न विचारून येथे लोकांना कोळशापासून होणाऱ्या त्रासाविषयी माहिती दिली.

तसेच कोळसा किती हानीकारक आहे तसेच दिवसागणीक लोक कोळसा कसा खातो याचे उदाहरण त्याच्यासमोर ठेवले. कोळशाची क्षमता मुरगाव बंदरात दिवसेन दिवस वाढत असून मुरगाव बंदर हे कोळसा हब बंदर झाले आहे. या कोळशापासून विविध प्रकारचे आजार बळावले आहेत.

या कोळशापासून आम्हा मुरगाव वासियांना मुक्तता मिळेल काय असा प्रश्न करून कर्नाटक राज्यात या कोळशाची वाहतूक गोव्यातून होत आहे. पण कर्नाटक हा कोळसा आपल्या बंदरात साठवून ठेवत नाही. कारण त्यांना माहीत आहे हा कोळसा किती घातक आहे तो.

तेव्हा हा कोळसा कशाही प्रकारे मुरगाव बंदरातून बंद करा. पाहिजे तर मी तुमच्या पायाकडे भर जनता दरबारात लोटांगण घालून साष्टांग नमस्कार घालतो अशी आर्त विनवणी भर दरबारात केली. पण यावर मंत्री सुदिन ढवळीकर निरुत्तर झाले.

त्यांनी याविषयी प्रदूषण नियंत्रण कक्षाला बोट दाखवून उत्तर देण्याचे सुनावले. यावर प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे अधिकारीही कोळसा कमी प्रमाणात हाताळत जात असल्याचे सांगू लागले.

पण आपण माहीती हक्क कायद्या अंतर्गत माहिती गोळा केल्याचे सांगून सद्या १९ मेट्रिक टन कोळसा हाताळणी मुरगाव बंदरातून वाढवण्यात आल्याचे त्यांनी माहीती उघड केली. लोकांना उल्लू करू नका असेही सदर अधिकाऱ्यांना त्यांनी सुचविले.

दरम्यान कोळसा प्रश्न आज जनता दरबारात गाजला. तसेच महामार्गावर कचरा समस्या जटील असून स्वच्छ भारत मिशन फेल ठरले असल्याचे सांगितले. करोडो रुपये खर्च करून फायदा काय?असा प्रश्न पोळजी यांना केला.

पालिका, पंचायत याचे नगरसेवक, पंच सदस्यांना जनजागृती करण्यास भाग पाडावे असा सल्ला त्यांनी यावेळी मंत्री ढवळीकर यांना दिला. हेडलॅण्ड सडा येथे कचरा प्रकल्पात वारंवार कचऱ्याला लागत असलेल्या आगी संदर्भात उपाय योजना आखण्याची विनंती केली.

याविषयी मुख्याधिकारी जयंत तारी यांनी स्पष्टीकरण दिले. तसेच रस्त्यांची झालेली दुर्दशे विषयीही प्रश्न उपस्थित करून मंत्री ढवळीकर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.

दरम्यान याव्यतिरीक्त आज जागे संदर्भात काहींच्या समस्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबीत आहेत. याविषयी समस्या मांडण्यात आल्या. ते प्रश्न लवकरच सोडविण्यात यावे असे मंत्री ढवळकर यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना सल्ला दिला.

तसेच वीज, पाणी समस्या अशा विषयावर जनता दरबार उपस्थितांनी प्रश्न मांडले. यावरही लवकरच तोडगा काढण्यात येईल असे मंत्री ढवळीकर यांनी जनता दरबारात लोकांचा प्रश्नाला उत्तर देताना आश्वासन दिले.

या जनता दरबारात वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आश्विन चंद्र तसेच इतर संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

तथापि, या कार्यक्रमाकडे लोकांनी पाठ फिरवली. मोजकेच लोक उपस्थित होते. मात्र सरकारी अधिकाऱ्यांची मात्र गर्दी मोठ्या प्रमाणात होती.

मिनी सभागृह सरकारी अधिकाऱ्यांनी तुडुंब भरले होते. जनता दरबार कार्यक्रमाला जनताच उपस्थित नाही, अशी परिस्थिती होती.

या कार्यक्रमाला सकाळी अकरा वाजता सुरवात झाली. परंतू रविंद्र भवनच्या सभागृहात केवळ सरकारी अधिकाऱ्यांचीच गर्दी जास्त होती. इतर लोकप्रतिनिधीही उपस्थित होते. सकाळी केवळ साडेअकरा पर्यंत केवळ 16 नागरीकांनी प्रश्न विचारण्यासाठी नोंदणी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Bike Week 2024: स्टंट, म्युझीक आणि बरंच काही... गोव्यात होणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या बाईक इव्हेंटचे वेळापत्रक प्रसिद्ध

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांची कारवाई! सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT