Yuri Alemao: निष्क्रियतेमुळे जाताहेत सामान्यांचे हकनाक बळी; सरकार अजून अशा किती घटनांची वाट बघणार?

'245 दिवसात 195 जणांचे मृत्यू' हे आकडेच सरकारचे अपयश दाखवतात.
Yuri Alemao
Yuri AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

Yuri Alemao सरकारचे सर्व खात्यांवरील नियंत्रण सुटले असून राज्यात सध्या स्वैराचा माजला आहे. खून, बलात्कार, दरोडा, अपघात या घटना दैनंदिन घडत असून प्रमोद सावंत सरकार यावर नियंत्रण ठेवण्यात सपशेल अपयशी ठरलं असल्याची टीका काँग्रेसचे युरी आलेमाव यांनी गोमंतकशी बोलताना केली.

'245 दिवसात 195 जणांचे मृत्यू' हे आकडेच सरकारचे अपयश दाखवतात. सरकारच्या निद्रिस्तपणामुळे लोकं हकनाक जीव गमावत आहेत. वाहतूक खात्याला विनंती करूनही अद्याप राज्यातीलअपघातप्रवण क्षेत्रं निश्चित करण्यात आली नाहीत.

Yuri Alemao
Sattari Theft Case: होंडा-सत्तरी चोरीच्या घटनेतील आरोपीला बेड्या; दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत

तसेच जे वाहतुकीचे नियम मोडून गाडी चालवतात त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. जे दारू पिऊन बेदरकारपणे गाड्या चालवतात त्यांच्याकडे सरकारचं पूर्णतः दुर्लक्ष झाले असून रस्ते अपघात रोखण्यातही सावंत सरकार पूर्णतः अपयशी ठरलं आहे.

त्याचप्रमाणे खून, विनयभंग, बलात्कार या घटनांविषयी बोलताना आलेमाव म्हणाले, गृहखात्याला अशा घटनांना आवर घालणे कठीण बनत चालले आहे. राज्यातील पोलीस यंत्रणा अशा घटना थोपवू शकते मात्र त्यांना बंधनात ठेवले जाते.

Yuri Alemao
Professional League Football: चर्चिल ब्रदर्सकडून हार पत्करलेल्या एफसी गोवाचा पहिलाच विजय; स्पोर्टिंगला नमविले

त्यामुळेच कायदा - सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असून मुख्यमंत्र्यांना याचे उत्तर जनतेला द्यावे लागेल.बाणस्तारी प्रकरणातही पोलिसांवर दबाव आणून तपास केला गेला.

विधानसभेत परप्रांतीयांच्या वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र यामागील सत्य हे समोर आले कि, अशा घटनांमध्ये फार कमी गुन्ह्यांची नोंद केली गेली. थोडक्यात मुख्यमंत्र्यांना गुन्हेगारी रोखणे जमत नाहीय त्यांचे खात्यांवरील नियंत्रण आणि वचक पूर्णतः सुटला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com