Crime News  Dainik Gomantak
गोवा

Valpoi News: बेकायदेशीर गोमांस वाहतूक प्रकरणी एकजण ताब्यात, वाळपई पोलिसांची कारवाई

Ganeshprasad Gogate

Valpoi News शुक्रवारी पहाटे 3.30 च्या सुमारास केरी चेकपोस्टवर एका बेकायदेशीर गोमांस वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आलीय.

बेळगावहून गोव्याच्या दिशेने येणारा सय्यद इस्माईल मरचोनी (रा. पेडणे) हा आपल्या ताब्यातील टाटा योध्दा टेम्पो (जीए-09-06 यु 6352) केरी चेकपोस्टवर आला असता त्याला पोलिसांनी अडवल्यावर त्याच्याकडील वाहनात गोमांस आढळून आले.

तसेच त्याच्याकडे मांस वाहन परवाना नसल्याचेही पोलीस तपासणीत उघड झाले. पोलिसांनी आरोपी सय्यद मरचोनी याला ताब्यात घेतलाय.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, बेळगावहून गोव्याच्या दिशेने गोमासाची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती गोप्रेमी राजीव झा यांना मिळाली होती.

त्यानुसार त्यांनी गोवा पोलिसांना सदर माहिती देऊन पाळत ठेवण्यास सांगितले होते. दरम्यान सदर वाहन केरी चेक पोस्टवर आल्यावर या वाहनावर धडक कारवाई करत वाळपई पोलिसांनी सर्व गोमास जप्त केले.

वाहनातील या मांसाची किंमत अंदाजे अकरा लाख असून यासंबंधीची तक्रार उसगाव फोंडा येथील गोप्रेमी राजीव झा यांनी वाळपई पोलिसात नोंदवली आहे. तसेच आरोपी सय्यद इस्माईल मरचोनी याला ताब्यात घेण्यात आले आहे.

वाळपई पोलिसांनी हस्तगत केलेल्या गोमासाचा पंचनामा करुन पशुवैद्यकीय डाॅक्टराकडून अहवाल घेतला आहे. या मासाची विल्लेवाट लावण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलेय.

यावेळी केरी येथील ड्युटीवर असलेले बाबलो गावकर यांना यावेळी वाहन ताब्यात घेण्यात मदत केली. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास वाळपई पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक दिनेश गडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक श्री ठाकूर व सहकारी पुढील तपास करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोल्ट्री उद्योगाला' सरकारकडून पूर्ण सहकार्य देणार! युवकांनी उद्योग-व्यवसायात यावे असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Illegal Fishing: गोव्‍याच्‍या समुद्रात धुडगूस घालणारे ट्रॉलर्स जप्‍त! बेकायदा मासेमारीविरुद्ध मत्स्योद्योग खात्याची कारवाई

Goa Navratri 2024: नेपाळ ते छत्रपती संभाजीनगर प्रवास, मुघलांच्या भीतीने गोव्यात स्थापन झालेली श्री महालसा देवी

Subhash Velingkar: वेलिंगकरांविरुद्ध आंदोलक आक्रमक; अनेक ठिकाणी तक्रारी दाखल, अटकेसाठी हालचाली सुरु

SCROLL FOR NEXT