Goa Public Transport: वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी गोव्यात 300 बसगाड्यांची गरज, डॉ. दिव्या राणे यांचे प्रतिपादन

Divya Rane: बसगाड्या यंदा सरकारने घेतल्या नाहीत तर वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार नाही, असे पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी विधानसभेत नमूद केले.
Goa public transport 300 buses
Goa public transport 300 busesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ३०० बसगाड्यांची गरज आहे. तेवढ्या बसगाड्या यंदा सरकारने घेतल्या नाहीत तर वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार नाही, असे पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी विधानसभेत नमूद केले.

वाहतूक, उद्योग आणि पंचायत खात्यांच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना डॉ. दिव्या राणे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, कदंब वाहतूक महामंडळाने आंतरराज्य मार्गावरील पूर्ण बससेवा अद्याप सुरू केलेली नाही. वाळपई-फोंडा मार्गावर विजेवर चालणारी बससेवा उपलब्ध करावी.

Goa public transport 300 buses
Kadamba Protest: EV बस 2 कोटीची, पगार मात्र 600 रुपये! कदंब चालक मागण्यांसाठी आक्रमक; संपाचा दिला इशारा

वाळपई बसस्थानकावर मूलभूत सुविधांचा अभाव आहे. प्रवाशांना तासन्‌तास बसस्थानकावर उभे राहावे लागते. त्या बसस्थानकाची तीन वर्षे देखभाल, दुरुस्ती झालेली नाही. ग्रामीण भागातील पंचायतींना अनुदान न मिळाल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम झालेला आहे. केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता म्हणाले, रस्ते अपघातात ६५ टक्के अपघात हे रेंट अ बाईक किंवा रेंट अ कार यांच्यामुळे होतात. यावर उपाय शोधला पाहिजे.

Goa public transport 300 buses
Kadamba Protest: EV बस 2 कोटीची, पगार मात्र 600 रुपये! कदंब चालक मागण्यांसाठी आक्रमक; संपाचा दिला इशारा

ग्रामीण भाग वंचित!

वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा म्हणाले, ग्रामीण भाग आजही बससेवेपासून वंचित आहेत. तेथे‌ बससेवा‌ सुरू करावी. सां जुझे द आरियाल औद्योगिक वसाहतीचा स्थानिकांना कोणताच फायदा होत नाही. प्रदूषण होत असल्याने स्थानिकांना भरपाई देण्यासाठी तरतूद सरकारने करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com