Rohan Khaunte, Abhay Deol  Dainik Gomantak
गोवा

Abhay Deol: 'गोव्यातील सगळ्या गोष्टींनी मला खूप प्रेरणा दिली'! Goa Unseen अनावरणावेळी अभिनेता अभय देओलने व्यक्त केले प्रेम

Goa Unseen Digital Guide: मृद्ध गोवा जगासमोर आणण्यासाठी पर्यटन खात्याने ‘एअरबीएनबी’च्या सहकार्याने ‘गोवा अनसीन’ ही डिजिटल मार्गदर्शिका प्रदर्शित केली आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोवा म्हटले की अनेक पर्यटकांना येथील समुद्र किनारे आणि रात्रभर चालणाऱ्या पार्ट्या एवढेच ठावूक आहे. पण यापलीकडे असलेला शांत, सुंदर आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध गोवा जगासमोर आणण्यासाठी पर्यटन खात्याने ‘एअरबीएनबी’च्या सहकार्याने ‘गोवा अनसीन’ ही डिजिटल मार्गदर्शिका प्रदर्शित केली आहे. ही मार्गदर्शिका पर्यटकांना गोव्यातील अन्य पर्यटन ठिकाणांची माहिती देईल.

गोवा पर्यटन विभाग आणि ‘एअरबीएनबी’च्या संयुक्त विद्यमाने चालवल्या जाणाऱ्या ‘रिडिस्कव्हर गोवा’ उपक्रमाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. ‘गोवा अनसीन’ ही मार्गदर्शिका खास करून गोव्याच्या दडलेल्या खजिन्यांची ओळख पर्यटकांना करून देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या मार्गदर्शिकेचे अनावरण पर्यटन मंत्री रोहन खंवटे, ‘एअरबीएनबी’चे भारत व आग्नेय आशिया प्रमुख अमनप्रीत सिंग बजाज आणि गोव्याशी खास जिव्हाळा असलेले लोकप्रिय अभिनेते अभय देओल यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

स्थानिक जाणकारांच्या मदतीने ‘गोवा अनसीन’ मार्गदर्शिका तयार करण्यात आली आहे. यामुळे पर्यटकांना गोव्याचा अधिक खरा, अस्सल आणि वेगळा अनुभव घेता येईल. या मार्गदर्शिकेमध्ये खाद्यसंस्कृतीचे अभ्यासक अविनाश मार्टिन्स, खाद्य विषयाचे लेखक नोलन मास्करेनहास, कलाकार आणि कंटेंट क्रिएटर सिद्धार्थ केरकर, ‘गोवा गेटर’चे संस्थापक गर्व वोहरा, पर्यटन लेखक इंशिया लेसवाला आणि टीव्ही होस्ट व कंटेंट क्रिएटर स्कार्लेट रोझ यांसारख्या तज्ज्ञांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

‘रिडिस्कव्हर गोवा २.०’ मोहीम आणि ‘गोवा अनसीन’ मार्गदर्शिकेबद्दल माहिती देताना पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले की, पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे आणि शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन देणे हा आमचा उद्देश आहे. यामुळे स्थानिक व्यवसाय, समुदाय आणि नवीन पिढीतील उद्योजक यांना लाभ मिळेल. विशेषतः ग्रामीण भागात होमस्टेच्या संकल्पनेला प्रोत्साहन देऊन आणि महिला व तरुणांना सक्षम बनवू.

गोवा कला, निसर्ग, लोक यांचा सुंदर संगम

अभिनेते अभय देओल यांनी सांगितले की, गोवा माझ्यासाठी नेहमीच एका शोधयात्रेसारखे राहिले आहे. या ठिकाणी कला, निसर्ग आणि इथले लोक यांचा सुंदर संगम आहे. इथल्या गर्द झाडीपासून ते शांत करणाऱ्यांपर्यंत आणि अनोख्या स्थानिक अनुभवांपर्यंत सगळ्या गोष्टींनी मला खूप प्रेरणा दिली आहे. ‘गोवा अनसीन’च्या माध्यमातून मी हा वेगळा गोवा जगासमोर आणण्यासाठी उत्सुक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT