Goa Tourism Growth: गोव्यात खरंच पर्यटक वाढले की स्थलांतरित झाले? 'मोपा'ला पसंती; प्रवाशांची संख्या वाढली

Mopa vs Dabolim passengers: मोपा विमानतळाच्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, तर पारंपरिक दाबोळी विमानतळावरील प्रवासी संख्या घटत आहे.
Mopa Airport
Mopa AirportDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Flight Statistics: गोव्यात २०२२ मध्ये सुरू झालेल्या मोपा विमानतळाच्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, तर पारंपरिक दाबोळी विमानतळावरील प्रवासी संख्या घटत आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे प्रमाण मोपावर वाढताना दिसते; पण दाबोळी विमानतळावर मोठी घट झाल्याने एकूण पर्यटन वाढले की केवळ स्थलांतर झाले, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे.

आर्थिक सर्वेक्षण अहवाल आणि विधानसभेतील प्रश्नांच्या उत्तरातून मिळालेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या दाबोळी विमानतळावर ४,८१,९१३ होती, तर मोपा विमानतळावर फक्त १३,८४५ परदेशी प्रवासी होते. २०२४ मध्ये मात्र दाबोळीवरील आंतरराष्ट्रीय प्रवासी घटून ३,०२,१३० वर आले, तर मोपावरील परदेशी प्रवासी तब्बल १,०१,८०४ वर पोहोचले. याचा अर्थ, नवीन प्रवासी वाढले असे न म्हणता, आंतरराष्ट्रीय पर्यटक मोठ्या प्रमाणात दाबोळीवरून मोपावर स्थलांतरित झाले असे दिसते.

सरकारच्या दाव्यानुसार, मोपा विमानतळामुळे गोव्यातील पर्यटन क्षेत्राने मोठी झेप घेतली आहे. मात्र, उपलब्ध आकडेवारीनुसार हा दावा संशयास्पद ठरतो, असे मत विरोधकांनी व्यक्त केले. पर्यटकांची संख्या वाढली असली तरी ती मुख्यतः विमानतळ बदलल्याचे दिसत आहे.

नवीन प्रवासी गोव्याला आलेत असे म्हणण्यापेक्षा, आधीचे पर्यटक दाबोळीऐवजी मोपावर आलेत, हे वास्तव आहे. देशांतर्गत प्रवाशांची संख्या मोपा विमानतळामुळेच वाढली आहे, असे आकड्यांवरून दिसून येते.

२०२३ मध्ये मोपावर १५,६३,१३० देशी प्रवासी आले, तर २०२४ मध्ये हा आकडा २२,४४,४९७ वर गेला. मात्र, याच काळात दाबोळीवर प्रवासी संख्या ६९,५५,३१३ वरून ६७,४१,४१५ वर घसरली. याचा अर्थ मोपा विमानतळाच्या वाढीमुळे गोव्यात पर्यटन वाढले असे अहवालावरून दिसते.

Mopa Airport
Mopa Airport: प्रवाशांसाठी मोपा विमानळावर ‘सेफक्लॉक’ सेवा! स्मार्ट डिजिटल लगेज लॉकर; ओटीपीद्वारे पडताळणीची सोय

मोपा विमानतळ

२०२३ आणि २०२४ मधील तुलनात्मक आकडेवारी पाहता, मोपा विमानतळावरून देशी आणि परदेशी प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २०२३ मध्ये १५,६३,१३० देशी प्रवासी आणि १३,८४५ परदेशी प्रवासी आले. २०२४ मध्ये देशी प्रवासी २२,४४,४९७ वर पोहोचले, तर परदेशी प्रवाशांची संख्या तब्बल १,०१,८०४ इतकी झाली. २०२५ च्या जानेवारी महिन्यातच ३,६२,६०० देशी आणि ५०,३१९ परदेशी प्रवासी मोपा विमानतळावर दाखल झाले.

Mopa Airport
Dabolim Airport: दाबोळी 'भूत बंगला' होणार; मोपामुळे दक्षिण गोव्यातील पर्यटन संकटात

दाबोळी विमानतळ

याच कालावधीत दाबोळी विमानतळावरील प्रवासी संख्येत घट झाली आहे. २०२३ मध्ये ४,८१,९१३ आंतरराष्ट्रीय प्रवासी होते, ते २०२४ मध्ये ३,०२,१३० वर आले. २०२५ च्या जानेवारीत फक्त २४,६१२ आंतरराष्ट्रीय प्रवासी दाबोळीवर आले. देशांतर्गत प्रवासी संख्या २०२३ मध्ये ६९,५५,३१३ होती, ती २०२४ मध्ये ६७,४१,४१५ वर आली. २०२५ च्या जानेवारीत ६,८६,१४९ देशी प्रवासी दाबोळीवर दाखल झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com