Goa Tourism: 'गोवा म्हणजे मौज मस्ती नव्हे! इथली खरी माणुसकी, संस्कृती ग्रामीण भागात'; तवडकरांनी मांडले रोखठोक मत

Ramesh Tawadkar: गोव्याची माणुसकी संस्कृती ग्रामीण भाागात दिसते हे पटवून देण्याची गरज आहे,असे मत सभापती रमेश तवडकर यांनी व्यक्त केले.
Goa Tourism, Ramesh Tawadkar
Ramesh TawadkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा म्हणजे मौज मस्ती , गोव्यात मद्यपान अन् इतर गोष्टी होतात, अशी अनेकांची समजूत झाली आहे. परंतु ही मानसिकता आम्हाला बदलवी लागेल तुम्ही पाहता तो गोवा खरा नव्हे. गोव्याची माणुसकी संस्कृती ग्रामीण भागात दिसते हे पटवून देण्याची गरज आहे,असे मत सभापती रमेश तवडकर यांनी व्यक्त केले.

भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत नेहरू युवा केंद्राने पर्वरी विधानसभा संकुलात आयोजित केलेल्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेंतर्गत राज्यस्तरीय युवा संसदेचे उद्‍घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा आणि युवा व्यवहार संचालक अरविंद खुटकर नेहरू युवा केंद्राचे कालिदास घाटवळ, डॉ. नितीन सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Goa Tourism, Ramesh Tawadkar
Goa Tourism Growth: गोव्यात खरंच पर्यटक वाढले की स्थलांतरित झाले? 'मोपा'ला पसंती; प्रवाशांची संख्या वाढली

सन्मान

गोवा पर्यटनाला नुकतेच प्रतिष्ठित अशा ‘एमआयटीटी कमबॅक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार राज्याच्या पर्यटन उत्कृष्टतेसाठीच्या समर्पणाला अधोरेखित करतो. गोवा पर्यटनाने अलीकडेच मॉस्को येथील क्रोकस एक्स्पो येथे झालेल्या ‘एमआयटीटी’ मध्ये भाग घेतला होता.

Goa Tourism, Ramesh Tawadkar
Goa Tourism: पर्यटकांना त्रास देणाऱ्या दलालांना किनाऱ्यावरून हटवणार! गोव्याची बदनामी होत असल्याचा दावा; 'पर्यटन'च्या बैठकीत निर्णय

पर्यटनात वाढ

गोव्यातील पर्यटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात देशी पर्यटकांच्या संख्येत २२ टक्‍क्‍यांनी तर विदेशी पर्यटकांच्या संख्येत ३ टक्क्यांनी वाढ झाली. म्‍हणजेच सरासरी पर्यटकांच्‍या संख्‍येत २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com