Goa Unseasonal Rain Dainik Gomantak
गोवा

Goa Unseasonal Rain: इफ्फी, तुळशी विवाहाच्या धामधूमीत 'अवकाळी'ची एंट्री; वरुणराजाच्या आगमनाने गोवेकरांची धांदल

Goa Unseasonal Rain: राज्यात 22 ते 26 नोव्हेंबरपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.

Ganeshprasad Gogate

Goa Unseasonal Rain: गोव्यात सध्या शेतीची कामे अर्ध्यावर आली असून कालपासून (गुरुवारपासून) तुळशी विवाह सणालाही सुरुवात झाली आहे. त्यातच राजधानी पणजीत इफ्फीचीही धामधूम सुरु आहे.

या सगळ्या सोहळ्याच्या वातावरणात शुक्रवारी वरुणराजाने एंट्री केल्याने एकच धावपळ उडाली. उत्तर गोव्यातील वाळपई आणि लगतच्या परिसरात तुफान अवकाळी बरसला.

मागील 2-3 दिवसांपूर्वी हवामान खात्याने गोव्यासाठी यलो अलर्ट जारी केला होता. राज्यात 22 ते 26 नोव्हेम्बरपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार आज म्हणजेच 24 नोव्हेम्बरला संध्याकाळी 3 ते 4 च्या दरम्यान वाळपई परिसरात तुफान पाऊस बरसला.

सध्या गोव्याच्या शहरी भागासह ग्रामीण भागातही तुळशी विवाहाची तयारी सुरु असून अंगण शेणाने सारवून, रांगोळी, पणत्यांसह सजावट केलेली दिसून येतेय.

मात्र अवकाळी बरसल्याने लोकांची तारांबळ उडाली. सकाळ पासून ढगाळ वातावरण असून प्रचंड उष्माही जाणवत होता. अखेर 4 च्या सुमारास वाळपईसह लगतच्या परिसरात जोरदार अवकाळी पावसाचं आगमन झालं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT