Goa University Paper Leak Scam Dainik GOmantak
गोवा

Goa University: ‘पेपरलीक’चा तपासणी अहवाल माध्यमांकडे गेला कसा? ‘विद्यापीठ टिचर्स’ने उघडले तोंड; चौकशीची केली मागणी

Goa University Paper Leak: गोवा विद्यापीठ टिचर्स असोसिएशनने विद्यापीठाच्या आवारात पत्रकार परिषद घेतली. यावेळी वाघ यांनी प्रसारमाध्यमांविषयी प्रसारमाध्यमांकडेच व्यक्त केलेली मते पाहता हा प्रकार हास्यास्पद वाटला.

Sameer Panditrao

पणजी: गोवा विद्यापीठात पेपर फुटीसारखा प्रकार घडल्यानंतर आणि त्यावर चौकशी समिती, तसेच त्याप्रकरणी पोलिस तक्रार होऊनही ‘हाताची घडी तोंडावर बोट'' अशी भूमिका घेऊन वागणाऱ्या गोवा विद्यापीठ टीचर्स असोसिएशनने अखेर तोंड उघडले. पेपर फुटीप्रकरणाचा तपासणी अहवाल फुटल्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी या संघटनेचे अध्यक्ष रामराव वाघ यांनी केली असल्याने आता असोसिएशनच्या एकूण भूमिकेवरच प्रश्न उपस्थित होत आहेत.

गोवा विद्यापीठ टिचर्स असोसिएशनने विद्यापीठाच्या आवारात पत्रकार परिषद घेतली. यावेळी वाघ यांनी प्रसारमाध्यमांविषयी प्रसारमाध्यमांकडेच व्यक्त केलेली मते पाहता हा प्रकार हास्यास्पद वाटला. विद्यापीठातील पेपर फुटीच्या तपासणी अहवालातील प्रमुख बाबी ‘गोमन्तक'ने लोकांसमोर आणल्या होत्या. परंतु वाघ यांनी ‘गोमन्तक'चे नाव न घेता प्रसारमाध्यमांकडे तो अहवाल कसा पोहोचला, याविषयी संशय व्यक्त केला.

त्याशिवाय या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. त्याशिवाय मागील दोन महिन्यांत विद्यापीठाविषयी चांगल्या आणि काही थोड्या वाईट गोष्टी अनेक ठिकाणी प्रसिद्ध होत आहेत. या बाबींकडे संघटना कशी पाहते, त्याविषयी माहिती देण्यासाठी आम्ही पुढे आलो आहोत, असे सांगून संघटनेची बाजू सावरण्याचा प्रयत्न वाघ यांनी केल्याचे स्पष्टपणे दिसते.

असोसिएशनची नुकतीच बैठक झाली आणि त्या बैठकीत विद्यापीठ शिक्षक व व्यवस्थापनाविषयी जे गैरसमज आहेत, ते प्रसारमाध्यमांकडे संघटनेने सांगावेत, अशी आम्हाला विनंती करण्यात आली. त्यानुसार पत्रकार परिषद आयोजिल्याचे वाघ यांनी सुरुवातीला स्पष्टीकरण दिले. कुलगुरू हरीलाल मेनन यांनी एका मुलाखतीनुसार बाहेरील शिक्षक घेण्यासाठी रहिवासी दाखल्याची अडचण असल्याने विद्यापीठाचा दर्जा घसरत असल्याचे म्हटल्याने जो वाद निर्माण झाला. त्यानंतर विद्यापीठात पेपर फुटीचा प्रकार घडला, पण त्याचवेळी नॅककडून विद्यापीठाची तपासणी होत होती, अखेर विद्यापीठाला ‘बी प्लस’ श्रेणी मिळाल्याचे वाघ यांनी नमूद केले.

कुलगुरूंची बाजू सावरण्याच्या वाघांचा प्रयत्न

विद्यापीठाला नॅकचे मानांकन मिळवून देण्यात सर्वच शिक्षकांचे योगदान आहे. कुलगुरूंनी आम्हाला सांगितले की, अनेक वरिष्ठ शिक्षक निवृत्त होणार आहेत, नव्याने आलेल्या शिक्षकांना विविध कामे करण्यात वेळ लागेल. त्यामुळे परराज्यातील शिक्षक बोलावून विद्यापीठाचे मानांकन वाढविण्यासाठी आपण ते विधान केले होते, असे कुलगुरूंच्या वतीने हे सांगण्याची वाघ यांची भूमिकाही न पटणारी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुडतरी चोरीप्रकरणी दोघांना अटक

Mayem Lake: मये तलावाला लवकरच येणार 'अच्छे दिन', जोडरस्त्याच्या कामाचा प्रारंभ; नोव्हेंबरपासून पर्यटनाला चालना

Fatorda Stadium: स्टेडियमसाठी जागा दिलेल्यांना मिळणार घराची मालकी, मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन; विजय सरदेसाईंनी घडवून आणली कुटुंबीयांची भेट

Horoscope: पैशांचा पाऊस पडणार! गुरुवारी अचानक होणार धनलाभ, 'या' 3 राशींचे नशीब चमकेल आणि आर्थिक स्थिती होईल मजबूत

Bihar Assembly Election: प्रशांत किशोर निवडणूक लढणार नाहीत, पक्षसंघटनात्मक कामासाठी निर्णय घेतल्याचा दावा

SCROLL FOR NEXT