Diwali Bonus For Non Teaching Staff Dainik Gomantak
गोवा

Goa University: विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा!! 'त्या' ट्विटनंतर दिवाळी बोनस मिळाला

Diwali Bonus For Non Teaching Staff: गोवा विद्यापीठ प्रशासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस जारी केला आहे

Akshata Chhatre

Goa University

पणजी: गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरचिटणीस आणि प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी आज (दि.6 नोव्हेंबर) रोजी सकाळी एक्स किंवा ट्विटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून गोवा विद्यापीठातील 348 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्याप दिवाळीचा बोनस न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त केली होती आणि आता समोर आलेल्या माहितीनुसार गोवा विद्यापीठ प्रशासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस जारी केला आहे.

दुर्गादास कामत यांनी केलेल्या ट्विट नुसार गोवा विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 6,900 रुपयांचा वार्षिक दिवाळी बोनस दिला गेला नव्हता आणि याची एकूण रक्कम 24 लाखांच्या घरात जाणारी होती.

आपल्या ट्विटमधून त्यांनी विद्यापीठाला त्वरित “दादागिरी” बंद करण्याचा आदेश दिला होता तसेच राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना एकूण प्रकरणात हस्तक्षेप करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मदत करण्याचे आवाहन केले होते.

नोव्हेंबरमध्ये मिळणार वाढीव महागाई भत्ता

शिवाय आता सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै महिन्याच्या थकबाकीसह नोव्हेंबरमध्ये दिला जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भात्यात 3 टक्क्यांची वाढ झाल्याने हा आकडा 50 वरून 53 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सेवेत मुदतवाढ दिलेल्यांकरवीच नोकरी घोटाळा, सखोल चौकशीअंती अनेक ‘पूजा’ सापडतील; सरदेसाईंचा घणाघात

Rashi Bhavishya 7 November 2024: मेहनतीचं फळ मिळण्याचा आजचा दिवस, नातेवाईकांच्या भेटीचाही योग; जाणून घ्या काय सांगतयं 'या' राशीचं भविष्य

United Tribal Association Alliance: ‘उटा’ संघटनेमध्ये उभी फूट? शहीदांच्या बलिदानाचे राजकीय भांडवल केल्याचा मंत्री गावडेसह अध्यक्षावर आरोप

Goa Tourism: गोव्यापेक्षा थायलंडला पसंती! टॅक्सी माफिया, महागडे हॉटेल्सचा पर्यटनाला फटका?

Goa Eco Sensitive Zone: 'त्या' 21 जैवसंवेदनशील गावांची पाहणी करणार केंद्रीय समिती; बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांना वेळ आहे का? मंत्रालयाकडून विचारणा

SCROLL FOR NEXT