7th Pay Commission DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांची होणार निराशा, एवढ्या टक्क्यांनी DA वाढणार!

DA Hike: तुम्ही स्वतः किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
Money
MoneyDainik Gomantak
Published on
Updated on

7th Pay Commission DA Hike: तुम्ही स्वतः किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. होय, केंद्रीय कर्मचाऱ्यांना चिंता सतावत आहे की, सप्टेंबरमध्ये सरकारकडून किती महागाई भत्ता वाढवला जाईल? पीटीआयच्या रिपोर्टनुसार, यावेळी केंद्र सरकार सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करु शकते. यासह तो सध्याच्या 42% वरुन 45% पर्यंत वाढेल.

45 टक्के करण्याची चर्चा सुरु आहे

पीटीआयच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, केंद्र सरकार एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डीए आणि डीआर रिलीफ दर 45 टक्क्यांपर्यंत वाढवण्याबाबत चर्चा करत आहे. कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी DA/DR चा दर कामगार मंत्रालयाच्या विंग लेबर ब्युरोने जारी केलेल्या AICPI निर्देशांकाच्या आधारे दरमहा निश्चित केला जातो.

Money
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, पगार तब्बल एवढ्या हजारांनी वाढणार!

सरकार दशांश बिंदूच्या पुढे डीए वाढवण्याचा विचार करत नाही

जून 2023 साठी CPI-IW 31 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध झाला. ऑल इंडिया रेल्वेमेन फेडरेशनचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा म्हणाले की, यावेळी आम्ही महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याची मागणी करत आहोत. पण महागाई भत्त्यात वाढ 3 टक्क्यांपेक्षा थोडी जास्त आहे. सरकार दशांश बिंदूच्या पुढे डीए वाढवण्याचा विचार करत नाही. त्यामुळे डीए 3 टक्क्यांनी वाढून 45 टक्के होण्याची शक्यता आहे.

हा नियम 1 जुलै 2023 पासून लागू होणार आहे

मिश्रा पुढे म्हणाले की, अर्थ मंत्रालय महसुली परिणामांसह डीए वाढवण्याचा प्रस्ताव तयार करेल. त्यानंतर तो हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येईल. डीए/डीआर मधील वाढ घोषणेनंतर 1 जुलै 2023 पासून लागू होईल. सध्या एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक आहेत. त्यांना मूळ वेतन/पेन्शनच्या 42% दराने DA/DR मिळत आहे.

Money
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना 31 जुलैला मिळणार मोठी भेट, पगारात होणार बंपर वाढ

शेवटची डीए वाढ 24 मार्च 2023 रोजी करण्यात आली होती आणि ती 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आली होती. त्यावेळी केंद्र सरकारने डीए 4% ने वाढवून 42% केला होता. सरकार दर सहा महिन्यांनी DA/DR वाढवते. अशा प्रकारे, दरवर्षी दोनदा महागाई भत्ता वाढवला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com