Harilal Menon Goa University Dainik Gomantak
गोवा

Goa University: 'बाहेरून प्राध्यापक येत नसल्याने गोवा विद्यापीठाचा दर्जा घसरला'! कुलगुरूंच्‍या वक्तव्‍यामुळे राज्‍यात संतापाची लाट

Goa University VC Harilal Menon: विद्यापीठात इतर राज्‍यांतील भरती करण्‍यास गोवा फॉरवर्डने पूर्णपणे विरोध दर्शवला होता. तरीही सरकारने मोकळीक दिल्‍याने ते कारभार मनमानीपणे करीत असल्‍याची टीका प्रशांत नाईक यांनी केली.

Sameer Panditrao

पणजी: रहिवासी दाखल्‍याची अट असल्‍यामुळे गोव्‍यात बाहेरील राज्‍यांतून तज्ज्ञ प्राध्‍यापक आणता येत नाही. त्‍याचा परिणाम म्‍हणून विद्यापीठाचा दर्जा घसरत असल्‍याचे जे वक्तव्‍य कुलगुरू हरिलाल मेनन यांनी केले होते, त्‍यावरून आता राज्‍यात संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षांसह प्राध्‍यापकांनीही मेनन यांच्‍या या वक्तव्‍याला तीव्र आक्षेप घेतला आहे.

गोवा फॉरवर्डच्‍या दिलीप प्रभुदेसाई आणि प्रशांत नाईक यांनी कुलगुरूंना थेट लक्ष्‍य केले. गोवा विद्यापीठातील अनेक स्‍थानिक प्राध्‍यापक राष्‍ट्रीय, आंतरराष्‍ट्रीय पातळीवर शोधप्रबंध सादर करीत आहेत. त्‍यांची संशोधनात्‍मक कामगिरी दर्जेदार असून, त्‍यांनी ते सिद्धही करून दाखवलेले आहे. तरीही अशी वक्तव्‍ये करणे पूर्णपणे चुकीचे आहे, असे दिलीप प्रभुदेसाई यांनी स्‍पष्‍ट केले.

तर, गोवा विद्यापीठात इतर राज्‍यांतील भरती करण्‍यास गोवा फॉरवर्डने पूर्णपणे विरोध दर्शवला होता. तरीही सरकारने याबाबत मेनन यांना पूर्णपणे मोकळीक दिल्‍याने ते विद्यापीठाचा कारभार मनमानीपणे करीत असल्‍याची टीका प्रशांत नाईक यांनी केली. रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍स पक्षाचे (आरजीपी) संस्‍थापक अध्‍यक्ष मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांनीही मंगळवारी पत्रकार परिषद घेत, मेनन यांच्‍यावर टिकास्र सोडले.

प्रा. संजय देसाई म्‍हणाले...

१ रहिवासी प्रमाणपत्राची अट असल्‍यामुळे गोवा विद्यापीठात बाहेरील तज्ज्ञ प्राध्‍यापक आणता येत नाहीत. त्‍याचा परिणाम विद्यापीठाच्या दर्जावर होत असल्‍याचा कुलगुरू हरिलाल मेनन यांचा दावा न पटण्‍यासारखा आहे. कारण विद्यापीठाच्‍या दर्जासंदर्भात हा एकच पॅरामीटर नसून, शिक्षण, संशोधन, शिक्षणासाठी बाहेरून येणारे विद्यार्थी तसेच लोकांचा विद्यापीठाकडे बघण्‍याचा दृष्‍टिकोन या गोष्‍टीही महत्त्‍वाच्‍या असतात.

२ गोवा विद्यापीठ स्‍थापन होऊन ४० वर्षे झाली. विद्यापीठ स्‍थापन झाल्‍यानंतर अधिकाधिक प्राध्‍यापक इतर राज्‍यांतून आले होते. नंतरच्‍या काळातील पिढी ही या बाहेरील प्राध्‍यापकांनी घडवली. पण, कुलगुरू मेनन यांच्‍या या वक्तव्‍यातून त्‍या प्राध्‍यापकांचे अपयश समोर येते.

३ विद्यापीठातील अनेक विभागांत आजही इतर राज्‍यांतील बहुतांशी प्राध्‍यापक कार्यरत आहेत. गोवा विद्यापीठ हे राज्‍य विद्यापीठ असल्‍यामुळे तेथे स्‍थानिकांना प्राधान्‍य मिळणे गरजेचे आहे.

४ नव्‍या शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा समजत नसेल, तर त्‍यांच्‍या मातृभाषेतून शिक्षण द्यावे लागणार आहे. अशा स्‍थितीत बाहेरून गोव्‍यात येणाऱ्या प्राध्‍यापकांना कोकणीचे ज्ञान असेल, कोकणी बोलता येत असेल, तर त्‍यांच्‍यासमोर कोणताही प्रश्‍न असणार नाही.

प्रा. रामराव वाघ म्हणाले...

1 शिक्षकपदासाठी रहिवासी दाखला आवश्यक करण्याच्या कलमामुळे मानांकन यादीमध्ये गोवा विद्यापीठाचा दर्जा घसरला, या कुलगुरूंच्या वक्तव्याला काही आधार नाही.

2 विद्यापीठाचा दर्जा ठरवण्यासाठी नॅक (राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन संस्था) गोव्यात आलेली असतानाच अशा विषयावर बोलून आपण आपलेच नुकसान करत आहोत, याचे भान कुलगुरूंनी ठेवायला हवे होते.

3 आपली संघटना याविषयाबाबत कुलगुरूंशी चर्चा करणार आहे; कारण अनेकदा त्यांनी अशापद्धतीचे वक्तव्य केलेले आहे.

4 ज्या ‘एनआयआरएफ’ मानांकनाच्या बाबतीत त्यांनी हे वक्तव्य केले, तेथे गुण देताना अनेक बाबींचा विचार केला जातो. ज्याच्यामध्ये शिक्षण पद्धत, संशोधन, साधनसुविधा यांचा समावेश असतो व या सर्वच बाबतीत आमच्या विद्यापीठाची कामगिरी चांगली असते. आपण मागे पडतो याचे मुख्य कारण म्हणजे समाजाचा व प्रामुख्याने शिक्षण, संशोधन, व्यवसाय आदी क्षेत्रांमधील लोकांचा गोवा विद्यापीठाबद्दल दृष्टिकोन कसा आहे तिथेच. त्यातच विद्यापीठाला कमी गुण मिळतात.

5 रहिवासी दाखल्याची अट लागू केल्यानंतर विद्यापीठाने प्राध्यापकांची संख्या जवळपास दुप्पट केली व त्यातील बहुतांशी प्राध्यापकांनी उत्तम कामगिरी केली आहे. इतकेच नाही तर पूर्वीचे गोमंतकीय तसेच बिगर गोमंतकीय शिक्षकही उत्तम कामगिरी करत आहेत.

6 शिक्षण, संशोधनासोबत हे सर्वजण विद्यापीठाच्या इतर सर्व कार्यामध्ये भाग घेतात. त्यामुळे काही राजकीय पक्ष बिगरगोमंतकीय शिक्षकांचे नाव घेऊन त्यांची बदनामी करत आहेत, त्याचाही निषेध केला पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

WWE सुपरस्टारची गोळ्या घालून निर्घृण हत्या, 18 वर्षांची कारकीर्द एका क्षणात संपली

Wild Vegetables: पावसाळ्यातील किमया! गोव्यातील चविष्ट रानभाज्या..

'कोणतरी मरत नाही तोपर्यंत सरकार लक्ष देणार नाही'; मनसे नेत्याने शेअर केला कशेडी बोगद्याचा धक्कादायक व्हिडिओ

Shravan 2025: 'श्रावण सोमवार' व्रत करणार असाल तर 'हे' नक्की वाचा! काय करावं, काय टाळावं? पूजेचे संपूर्ण नियम

SCROLL FOR NEXT