Goa University: गोवा विद्यापीठाला 100 कोटींचे वित्तीय साहाय्य! संशोधन, बहुविध शिक्षणामध्ये होणार सक्षम

Goa University Funding: विद्यापीठाने नॅक मानांकन मिळवण्यासाठी सादर केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. विद्यापीठात १० महाविद्यालयांद्वारे ७७ पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. अभ्यासक्रम चालवले जातात.
Goa University
Goa UniversityDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: निसर्गरम्य परिसरात वसलेले गोवा विद्यापीठ आता शिक्षण, संशोधन व नवोन्मेष क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल टाकत आहे. केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान’अंतर्गत गोवा विद्यापीठाला १०० कोटी रुपयांचे वित्तीय साहाय्य देण्यात आले आहे. यामुळे विद्यापीठ बहुविध शैक्षणिक व संशोधन विद्यापीठ म्हणून अधिक सक्षम होणार आहे.

विद्यापीठाने नॅक मानांकन मिळवण्यासाठी सादर केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. विद्यापीठात १० महाविद्यालयांद्वारे ७७ पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. अभ्यासक्रम, तसेच दोन समाकलित अभ्यासक्रम चालवले जातात.

याशिवाय, ४० टक्के पीएच.डी. विद्यार्थी प्रतिष्ठित राष्ट्रीय फेलोशिपचे लाभार्थी आहेत. विद्यापीठाने ७ हजारांहून अधिक संशोधन लेख प्रकाशित केले असून एच इंडेक्स ८३ आणि ३० हजारांहून अधिक संदर्भ मिळविले आहेत.

Goa University
Goa University: नॅक समितीच्‍या गोवा दौऱ्याबद्दल गुप्‍तता! पथकाची जुलैमध्‍ये भेट; विद्यापीठ प्रशासनाचे मौन

आयटी स्टार्टअप्सना उज्ज्वल भवितव्य

गुरु संशोधन पार्कअंतर्गत बायो, हेल्थ आणि आयटी स्टार्टअप्ससाठी तीन इन्क्युबेटर कार्यरत आहेत. विद्यापीठाने ‘स्वयं’सारख्या व्यासपीठांवर अनेक ऑनलाईन अभ्यासक्रम राबवले आहेत. सौरऊर्जेच्या वापरामुळे २८.६ टक्के वीज खर्चात बचत झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. ही मदत गोवा विद्यापीठासाठी राष्ट्रीय पातळीवरील उच्च शिक्षण व संशोधनाच्या दिशेने उडी घेण्याची संधी ठरणार आहे, असे विद्यापीठाचे म्हणणे आहे.

Goa University
Private University: गोव्यात खासगी विद्यापीठांना मान्यता देऊ नका, गोवा स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनची सरकारकडे मागणी

‘नॅक’ दौऱ्याची माहिती गुलदस्त्यात

विद्यापीठाची पाहणी करण्यासाठी ‘नॅक’चे पथक ७ ते ९ जुलैदरम्यान येणार आहे. त्यासाठी हा अहवाल एप्रिलमध्येच ‘नॅक’ला सादर केला आहे. ‘नॅक’चा दौरा जाहीर झाला असला तरी महत्त्वाच्या घटकांपर्यंत विद्यापीठाने ही माहिती पोचवलेलीच नाही. केवळ विद्यापीठापुरता हा विषय मर्यादित ठेवला आहे. राज्य सरकार, आमदार यांना याची कल्पना दिली नसल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com