Goa University | Harilal B Menon Dainik Gomantak
गोवा

Goa University: गोवा विद्यापीठ ही महत्त्वाची संस्था- कुलगुरु मेनन

Goa University: आधुनिक गोव्याच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदानाचे काम विद्यापीठाने केले.

दैनिक गोमन्तक

गोवा मुक्तीनंतर समर्थ गोव्याच्या उभारणीसाठी ज्या संस्था आणि संशोधन केंद्रे सुरू झाली त्यातील गोवा विद्यापीठ ही महत्त्वाची संस्था आहे. आधुनिक गोव्याच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देऊन सामान्य माणसाच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम विद्यापीठाने केले पाहिजे, असे प्रतिपादन गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. हरिलाल मेनन यांनी केले. ते गोवा विद्यापीठाच्या आवारात गोवा मुक्तिदिनाच्या कार्यक्रमात ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित होते.

यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. व्ही.एस. नाडकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रा. मेनन पुढे म्हणाले की, आधुनिक जगाला उपयुक्त असे ज्ञान विद्यार्थ्यांना देऊन सशक्त अशी युवा पिढी घडविण्याचे कार्य विद्यापीठाला करायचे आहे. त्यासाठी सर्वांना एकात्म भावनेने काम करावे लागेल तरच आपण समर्थ गोव्याच्या उभारणीत सक्रिय योगदान देऊ शकू.

कार्यक्रमात कुलगुरूंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर समूहगीत सादर केले. या कार्यक्रमाला विद्यापीठातील शिक्षकवर्ग, प्रशासकीय वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'रोहित- विराट मैदानात खेळताना दिसले की मी...'; क्रिकेट दिग्गजाचं मोठं वक्तव्य, 2027च्या वर्ल्ड कपबाबतही केली मोठी भविष्यवाणी

Konkan Railway: कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाला वेग; पेडणे-जुनेगोवे येथे नवे बोगदे, रेल्वे मंत्रालयाकडून निधी मंजूर

Goa Protected Monuments: गोव्यातील 15 प्राचीन स्मारकांना संरक्षित स्थळांचा दर्जा; हात कातरो खांब, मर्दनगड किल्ल्यासह ऐतिहासिक वास्तूंचा समावेश

Goa Politics: 'भाजपला हरवायचा प्लॅन काय?' काँग्रेसने स्पष्ट करावे; 'आप'चे गोवा अध्यक्ष वाल्मिकी नायक यांचा थेट सवाल

Goa Business Regulations: उद्योगांसाठी नियम सुलभ करणाऱ्या कायद्याला राज्यपालांची मंजुरी; परवानग्या, अनुपालन प्रक्रिया होणार सोपी

SCROLL FOR NEXT