Goa Liberation Day: डिचोलीत शासकीय मुक्तिदिन सोहळा उत्साहात साजरा

Goa Liberation Day: एकसष्टाव्या गोवा मुक्तिदिनानिमित्त डिचोलीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आला होते.
Premendra Shet | Goa Liberation Day 2022
Premendra Shet | Goa Liberation Day 2022Dainik Gomantak

Goa Liberation Day 2022: स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागामुळेच आज जनता सुखी आणि समृद्ध आहे. आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या आणि हयात असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे मत मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी डिचोली येथे व्यक्त केले.

एकसष्टाव्या गोवा मुक्तिदिनानिमित्त आयोजित शासकीय पातळीवरील सोहळ्यात आमदार शेट प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. भारतीय सैन्यदलाचे जवान जीव धोक्यात घालून देशाचे रक्षण करीत असल्यामुळे प्रत्येक नागरिक सुरक्षितपणे नांदत आहे, असेही आमदार म्हणाले.

याप्रसंगी डिचोलीचे उपजिल्हाधिकारी रोहन कासकर, मामलेदार राजाराम परब, संयुक्त मामलेदार अक्षया आमोणकर, श्रीपाद माजिक आणि गट विकास अधिकारी श्रीकांत पेडणेकर उपस्थित होते.

Premendra Shet | Goa Liberation Day 2022
Goa Cruise Terminal: गोवेकरांची गैरवर्तणूक अन् गुंडगिरी आली अंगलट; फ्रान्‍सची 3 क्रुझ जहाजे रद्द होण्याची दाट शक्यता

तत्पूर्वी आमदार शेट यांनी ध्वजारोहण केल्यानंतर पोलिस आणि अग्निशामक दलाच्या जवानांकडून मानवंदना स्वीकारली. उपजिल्हाधिकारी कासकर यांनी आपले विचार मांडले. अवरलेडी ऑफ ग्रेस आणि सरकारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ति गीत सादर केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com