Goa University Dainik Gomantak
गोवा

Goa University: गोवा विद्यापीठाला सर्वोच्च न्यायालयाची 'नोटीस'! 4 कोटींच्या GSTचे प्रकरण; होणार सविस्तर सुनावणी

Goa University GST case: गोवा विद्यापीठावर आकारलेली जीएसटी मागणी रद्द करण्यात आल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिल्याने त्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोवा विद्यापीठावर आकारलेली सुमारे ४.८४ कोटींची जीएसटी मागणी रद्द करण्यात आल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिल्याने त्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

यावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने गोवा विद्यापीठाला नोटीस बजावली आहे. केंद्र सरकारच्या केंद्रीय जीएसटीचे संयुक्त आयुक्त, केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळ आणि वस्तू व सेवा कर परिषद यांनी ही याचिका दाखल केली आहे.

न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची प्राथमिक सुनावणी झाली आहे. न्यायालयाने गोवा विद्यापीठाला प्रतिवादी मानत नोटीस बजावली असून पुढील तारखेवर या प्रकरणाची सविस्तर सुनावणी होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालय, गोवा खंडपीठाने दिलेल्या निकालात म्हटले होते की, गोवा विद्यापीठ हे वैधानिक मंडळ म्हणून शिक्षण क्षेत्रातील कार्ये बजावत आहे आणि ते व्यापारी स्वरूपाचे नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या संलग्नता शुल्कावर जीएसटी लागू होत नाही.

न्यायालयाने स्पष्ट केले होते की, हे शुल्क म्हणजे व्यावसायिक मोबदला किंवा व्यापारी व्यवहारातील सेवा पुरवठा नसून, विद्यापीठाने कायद्याने ठरविलेल्या कार्यासाठी घेण्यात येणारे नियामक शुल्क आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT