Goa University  Dainik Gomantak
गोवा

Goa University : विद्यापीठ निर्बंधित क्षेत्रात कचरा; पंचायतीचेही दुर्लक्ष

Goa University : गोवा विद्यापीठाचा प्रवेशबंदी असा फलक असूनही मोकळ्या जागेत रात्री ट्रकने हा कचऱ्याचा ढिगारा टाकण्यात येत आहे. विद्यापीठ व्यवस्थापनाचे याकडे लक्ष नसल्याने कचरावाहू ट्रकचालकांचे चांगलेच फावले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa University :

पणजी, ताळगाव पठार तसेच सांताक्रुझ या परिसरात रात्रीच्यावेळी मोकळ्या जागेत तसेच शेतजमिनीत बेकायदेशीरपणे माती-दगडीचा कचरा टाकण्याचे प्रकार सुरू आहेत मात्र त्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी संबंधित पंचायतीकडून कोणतीच पावले उचलण्यात येत नाही.

गोवा विद्यापीठाचा प्रवेशबंदी असा फलक असूनही मोकळ्या जागेत रात्री ट्रकने हा कचऱ्याचा ढिगारा टाकण्यात येत आहे. विद्यापीठ व्यवस्थापनाचे याकडे लक्ष नसल्याने कचरावाहू ट्रकचालकांचे चांगलेच फावले आहे.

ताळगाव पठारावर गोवा विद्यापीठची मोठ्या प्रमाणात जागा आहे. या जागेच्या काही ठिकाणी विद्यापीठ क्षेत्र असलेले फलकही लावलेले आहे व आतमध्ये घुसखोरी न करण्याचेही फलक आहेत. तरीही रात्रीच्यावेळी या जागेत त्या ठिकाणी असलेल्या झाडांच्या आडोशाला ट्रकाने कचरा टाकण्यात येत आहे. ताळगाव पठारच्या बाजूने रात्रीच्यावेळी वाहनांव्यतिरिक्त लोकांची वर्दळ नसल्याने त्याचा फायदा उठविला जात आहे.

ही जागा गोवा विद्यापीठाची असल्याने पंचायकडून त्यात हस्तक्षेप केला जात नसल्याची माहिती एका पंचसदस्याने दिली. विद्यापीठ प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. टाकाऊ माती-दगडीचा कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नियम आहेत, मात्र त्याचे उल्लंघन करून असे बेकायदेशीर प्रकार कचरावाहू ट्रक चालकांनी चालविले आहे.

कुजिरा - सांताक्रुझ येथे नवीन बांधकामे उभी राहत आहेत. या ठिकाणी तेथे असलेल्या शेतजमिनीत दगडमाती तसेच झाडांच्या फांद्या तसेच त्याची मुळे टाकून देण्यात आली आहेत. या ठिकाणी अशा प्रकारे भराव टाकून ही शेतजमिनी बजुवून तेथे काही दिवसांनी नवीन बांधकामे उभी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा भाग सांताक्रुझ पंचायत क्षेत्रात येऊनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

फार्महाऊस म्हणून पक्की बांधकामे

सांताक्रुझ येथील बांधाच्या बाजूने असलेल्या शेतजमिनीमध्ये दगडमातीचा भराव टाकून तेथे बेकायदेशीर बांधकाम केली जात आहेत. काही फार्महाऊसच्या नावाखाली पक्की बांधकामे केली आहेत. रस्त्याच्या एका वळणावर फळेविक्रेते तसेच मासे विक्रेते बाजूने बस असल्याने खरेदीसाठी वाहन चालक थांबतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. सांताक्रुझ पंचायतीकडून बेकायदेशीर कृत्यांकडे डोळेझाक होत असल्यानेच या विक्रेत्यांचे फावले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

SCROLL FOR NEXT