North Goa Lok Sabha Election 2024 Results Live: श्रीपाद नाईकांना मंत्रीपद मिळणार? विजयानंतर भाऊ काय म्हणाले?

Goa Lok Sabha Election 2024 Results Live Updates in Marathi | Shripad Naik VS Ramakant Khalap VS Manoj Parab: गोव्यातील दोन लोकसभा जागांसाठी 07 मे रोजी मतदान झाले होते. यावेळी दोन्ही (भाजप, काँग्रेस) पक्षात काँटे की टक्कर होताना दिसत आहे.

North Goa Election 2024 Results Live: उत्तरेत श्रीपाद भाऊ आघाडीवर, खलप पिछाडीवर
North Goa Loksabha Election 2024 Results Live News on Shripad Naik, Ramakant Khalap, Manoj Parab, Constituency Wise ResultDainik Gomantak

Shripad Naik: श्रीपाद नाईकांना मंत्रीपद मिळणार? काय म्हणाले भाऊ?

उत्तर गोव्यातील मतदारांच्या आशीर्वादामुळे डबल हॅट्रीक करणे शक्य झाले. पक्षाकडे मंत्रीपद मागितले नसून पक्ष देईल ती जबाबदारी घेण्यास तयार असल्याचे विजयानंतर श्रीपाद नाईक म्हणाले.

Shripad Naik Won From North Goa: श्रीपाद नाईक 1.13 लाख मतांनी विजयी

उत्तर गोव्यात भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक 1.13 लाख मतांनी विजयी झाले असून, त्यांना एकूण 2,53,812 मते मिळाली आहेत. तर, खलप यांना 1,40,191 एवढी मते मिळाली आहेत.

Shripad Naik Leads From North Goa: खलपांनी पराभव केला मान्य, श्रीपाद नाईकांचे केले अभिनंदन

उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक यांना विक्रमी एक लाखाहून अधिक मतांची आघाडी मिळाली असून, याबाबत त्यांचे प्रतिस्पर्धी रमाकांत खलप यांनी अभिनंदन केले आहे. जनतेने दिलेला निर्णय मान्य असून, लोकसेवेसाठी कायम तत्पर असल्याचे देखील खलप यांनी म्हटले आहे.

North Goa Shripad Naik: श्रीपाद नाईक यांनी घडवला इतिहास, आजवरची मोठी आघाडी

श्रीपाद नाईक यांनी आजवरच्या विजयी आघाडीचा विक्रम मोडीत काढला असून, सुमारे 1,11,559 मतांची आघाडी घेतली आहे. नाईक यांना आत्तापर्यंत 2,48,955 मते मळाली असून, खलप यांना 1,37,396 मते मिळाली आहेत.

Shripad Naik Leading By One Lakh From North Goa: नाईकांनी मोडला रेकॉर्ड; उत्तरेतून विक्रमी एक लाखांचे लीड

उत्तर गोव्यात भाजपच्या श्रीपाद नाईक यांनी एक लाखांचे मताधिक्य पार केले आहे. भाजपच्या नेत्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, नाईक यांनी विक्रमी मताधिक्याचा आकडा पार केला आहे. ताज्या कलांनुसार नाईक 1,00,158 मतांनी आघाडीवर आहेत.

North Goa Vote Counting: श्रीपाद नाईकांना 94 हजारांची आघाडी

सकाळी बारा वाजेपर्यंतची आकडेवारी

श्रीपाद नाईक - 2,15,780 (+ 94111)

रमाकांत खलप- 1,21,669 ( -94111))

मनोज परब - 38,765 ( -177015)

North Goa Counting Live: उत्तरेत श्रीपाद नाईक एक लाख मताधिक्याच्या जवळ

उत्तर गोव्यात भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक एक लाख मताधिक्याच्या दिशेने वाटचाल करत असून, नाईक यांना ताज्या अपडेटनुसार, 85,363 हजार मतांची आघाडी मिळाली असून, त्यांना 1,94,317 मते मिळाली आहेत.

तर, रमाकांत खलप यांना 1,08,954 लाख मते मिळाली आहेत. परबांना 34,738 मते मिळालीयेत.

Ramakant Khalap: लीड कोणासही मिळो, मी जिंकणारच - रमाकांत खलप

सुरुवातीच्या कलानुसार सध्या भाजपला लीड मिळाल्याचे दिसत आहे. मात्र, मीच विजयी होणार असा दावा काँग्रेस उमेदवार रमाकांत खलप यांनी केला आहे. काही ठिकाणी मला कमी मते मिळाली आहेत, याची कारणे शोधावी लागतील, पण अखेरीस मीच विजयी होईन. तसेच, निकाल काही आला तरी तो मोठ्या मनाने स्वीकरण्याची तयारी आहे, असे खलप म्हणाले.

North Goa Vote Counting Live: श्रीपाद नाईक स्वत:चाच विक्रम मोडणार?

सकाळी अकरा वाजेपर्यंतची आकडेवारी

श्रीपाद नाईक - 1,49,921 (+ 65691)

रमाकांत खलप- 84,230 ( -65691)

मनोज परब - 27,085 ( -122836)

Ramakant Khalap: काँग्रेस दोन्ही जागा जिंकणार! रमाकांत खलप यांनी व्यक्त केला विश्वास

काँग्रेस गोव्यातील दोन्ही जागा जिंकणार असा, विश्वास उत्तर गोवा उमेदवार रमाकांत खलप यांनी व्यक्त केला आहे.

North Goa Vote Counting Live: श्रीपाद नाईक गड राखणार? उत्तरेत भाजप आघाडीवर

तिसऱ्या फेरीनंतरची आकडेवारी

श्रीपाद नाईक - 98639 (+ 41796)

रमाकांत खलप- 56843 ( -41796)

मनोज परब - 18080 ( -80559)

Shripad Naik And Ramakanr Khalap: भाई आणि भाऊ! लोकसभा महासंग्रामाचा निकाल एकत्र पाहाताना

Shripad Naik And Ramakanr Khalap
Shripad Naik And Ramakanr KhalapDainik Gomantak

North Goa Loksabha Result 2024: उत्तर गोव्यात एकही मतदारसंघात काँग्रेसला आघाडी नाही

North Goa Loksabha Result 2024

उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक आणि रमाकांत खलप यांच्या निकराची लढत होईल, असे अंदाज वर्तवले जात असताना सकाळी दहापर्यंच्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार उत्तरेत एकही मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर नाही. यामुळे काँग्रेस पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.

North Goa Loksabha Result 2024: उत्तरेत श्रीपाद भाऊ आघाडीवर, खलप पिछाडीवर

North Goa Loksabha Result 2024

North Goa Loksabha Election 2024 Results Live News on Shripad Naik, Ramakant Khalap, Manoj Parab, Constituency Wise Result
North Goa Loksabha Election 2024 Results Live News on Shripad Naik, Ramakant Khalap, Manoj Parab, Constituency Wise ResultDainik Gomantak

North Goa Vote Counting News: उत्तर गोव्याच्या लोकसभा जागेची मतमोजणी अर्धातास उशिरा

उत्तर गोव्याच्या लोकसभा जागेची मतमोजणी अर्धा तास उशिरा सुरु, 8:30 वा. प्रत्यक्ष मोजणीस प्रारंभ होणार

Vote Counting StartIn Goa: मतमोजणीस प्रारंभ, सर्वप्रथम पोस्टल मत मोजणी होणार

गोव्यातील दोन्ही मतदारसंघातील मतमोजणीस प्रारंभ झाला असून, सर्वप्रथम पोस्टल मते मोजली जाणार आहेत. साडे आठनंतर EVM ची मतमोजणी केली जाणार आहे.

Vote Counting Begins In Goa Begins
Vote Counting In Goa BeginsDainik Gomantak

Shripad Naik: उत्तर गोव्यात श्रीपाद नाईकांचा बोलबाला राहिला

राज्यात घडलेल्या घडामोडीनंतर ही निवडणुक चुरशीची ठरली. 2019 मध्ये भाजपचे जेष्ठ नेते श्रीपाद नाईक यांनी उत्तर गोव्यातील मतदारांनी भरघोस मतांनी विजयी केले. सामान्य समस्यांपासून ते राष्ट्रीय मुद्दे उत्तर गोव्यात गाजले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीपाद नाईक यांच्यासाठी प्रचारसभा घेतली.

North Goa Election Result: भाऊ, खलप का परब? उत्तरेची धुरा कोणाकडे? आज फैसला

लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामाचा आज निकाल आहे. यंदाची लोकसभा निवडणुक सात टप्प्यात पार पडली. राज्यातील दोन जागांसाठी सत्ताधारी भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात निकराची लढाई पाहायला मिळाली. आज निकालाचा दिवस आहे.

उत्तर गोव्यातून भाजपने विद्यमान खासदार श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांना उमेदावारी दिली. तर, कॉंग्रेसने उत्तर गोव्यातून रमाकांत खलप (Ramakant Khalap) दरम्यान, उत्तर गोव्यातून कोण बाजी मारणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com