Goa University Dainik Gomantak
गोवा

Goa University: 'एनईटी'ला गोवा विद्यापीठाकडून ठेंगा? कोकणी विभागाने पात्र उमेदवारास 'PHD'स नाकारला प्रवेश

NET Qualified Candidate Denied Admission: पात्रता असूनही प्रवेश नाकारण्यात आल्याने या निर्णयावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: चार रिक्त जागा आणि एकच पात्र उमेदवार अशी परिस्थिती असतानाही राष्ट्रीय प्रवेश परीक्षेद्वारे (एनईटी) ‘पीएचडी’ प्रवेशासाठी तसेच साहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराला गोवा विद्यापीठाच्या कोकणी विभागाने प्रवेश नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे.

संबंधित उमेदवाराने ‘लोकजीवन आणि सांस्कृतिक अभ्यास’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून, राष्ट्रीय प्रवेश परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले होते. त्यानंतर त्याने ‘पीएचडी’ प्रवेशासाठी गोवा विद्यापीठाच्या शणैं गोंयबाब अभ्यास केंद्रात अर्ज केला होता.

मात्र, पात्रता असूनही प्रवेश नाकारण्यात आल्याने या निर्णयावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. उमेदवाराने विद्यापीठाच्या नियमांनुसार आवश्यक पात्रता पूर्ण केली असल्याचे सांगितले असून, प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे विद्यापीठातील ‘पीएचडी’ प्रवेश प्रक्रियेबाबत चर्चा सुरू झाली आहे.

‘पीएचडी’च्या चार जागा रिक्त कशा?

वास्तविक कोकणी विभागात पीएच.डी.साठीच्या चार जागा रिक्त का राहतात, हाच चिंतेचा विषय होऊ शकतो. त्यातून कोकणी भाषा व कोकणीतील संशोधनाचे जे चित्र उभे राहते, ते विद्यापीठाच्या कोकणी विभागासाठी लाजीरवाणे नाही काय? कोकणी विभागाने खरे तर अभ्यासकांना संशोधनासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. मात्र, या अभ्यासकेंद्राची भूमिका नेमकी उलटी दिसते. सामाजिक भेदभावांचा शिक्षणाच्या क्षेत्रावरील प्रभाव ही शिक्षण क्षेत्रातील एक मोठी समस्या आहे, असे तज्ज्ञ मानतात. हे प्रकरण त्याचे प्रातिनिधिक उदाहरण ठरू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT