NEET UG Exam: 'नीट'चे गलथान आयोजन; कारवाई होणार? पेडण्यातील कथित अनियमिततेची चौकशी करा: एनएसयूआयची मागणी

NEET UG Exam Irregularities: नीट-यूजी परीक्षेदरम्यान झालेल्या कथित घोळाची त्वरित चौकशीची मागणी ‘नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया’च्या (एनएसयूआयन) उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांना निवेदन सादर
NEET UG Exam
NEET UG Exam IrregularitiesDAINIK Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: पेडणे तालुक्यातील विर्नोडा येथील ‘संत सोहिरोबानाथ आंबिये गव्हर्नमेंट कॉलेज अँड रिसर्च सेंटर’ येथे घेतलेल्या नीट-यूजी परीक्षेदरम्यान झालेल्या कथित घोळाची त्वरित चौकशीची मागणी ‘नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया’च्या (एनएसयूआयन) उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांना निवेदन सादर केले.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची यापूर्वीच चौकशी सुरू केली असून त्याचा अहवाल येताच त्यावर कारवाईचे आश्वासन दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. निवेदन देताना एनएसयूआयचे सदस्य कुमार गवळी, सदाशिव बडिगेर, हर्ष देसाई आणि झैद शेख यांची उपस्थिती होती.

NEET UG Exam
NEET Exam: 15 मिनिटे आधीच परीक्षा हॉलमधून बाहेर काढले? पेडण्यातील 'त्या' धक्कादायक घटनेने गोव्यात खळबळ; 'नीट' प्रशासनावर प्रश्नचिन्ह

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केल्यानंतर सदस्य म्हणाले, विद्यार्थ्यांकडून आमच्याकडे आलेल्या तक्रारींनुसार, परीक्षा कक्ष ‘एजी-०७’मधील सुमारे २० उमेदवारांना परीक्षा संपण्याच्या नियोजित वेळेच्या जवळपास १५ मिनिटे आधीच लिहिणे थांबवण्यास सांगण्यात आले. त्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका जमा करून घेण्यात आल्या. याउलट, त्याच केंद्रावरील इतर कक्षांमधील उमेदवारांना मात्र अधिकृत वेळ संपेपर्यंत परीक्षा सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली होती.

आम्ही जिल्हा प्रशासनाला विनंती केली आहे की, या प्रकरणाची सीसीटीव्ही फुटेज, उपस्थितीचे रेकॉर्ड, परीक्षेची कागदपत्रे आणि संबंधित विद्यार्थी व परीक्षा कर्मचाऱ्यांचे जबाब या आधारे या आरोपांची पडताळणी करावी. तसेच आरोपांमध्ये सत्यता आढळल्यास स्वतंत्र चौकशी करावी आणि योग्य ती सुधारणात्मक पावले उचलावीत.

NEET UG Exam
नीट-यूजी फेरपरीक्षा; काही मिनिटांच्या उशिरामुळे दोघांना प्रवेश नाकारला, म्हापसा केंद्रावर 549 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये याची प्रशासनाने दखल घ्यावी. सर्वोच्च न्यायालयाने अशाच एका प्रकरणात विद्यार्थ्यांना वाढीव गुण दिले होते, याची आठवणही जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही करून दिली असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेत प्रत्येक विद्यार्थ्याला निष्पक्ष आणि समान संधी मिळायला हवी, असे नमूद करत या शिष्टमंडळाने संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याचे आणि बाधित उमेदवारांना न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले आहे.

काही विद्यार्थ्यांच्या स्वप्नाला तडा

नीट परीक्षा केंद्रांमध्ये झालेला गोंधळही आता समोर आला आहे. प्रवेशपत्रावर उल्लेख एक आणि प्रत्यक्षात बैठक व्यवस्था भलतीकडेच केली असल्याची अनेक प्रकरणे रविवारी उघडकीस आली. त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे यंदा डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले. याआधी पेपरफुटीमुळे ही परीक्षा पुढे ढकलली गेली होती, त्यामुळे आता तरी परीक्षा सुरळीत होईल का याचा ताण विद्यार्थ्यांवर होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mohammad Rizwan betting case
Gen Z Movement India
Goa College Student Election 2026
Govinda Sunita Ahuja Controversy
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com