Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; गोविंद गावडेंचे ‘स्टेटस’

Khari Kujbuj Political Satire: विद्यापीठात स्थानिक पातळीवर चांगले मनुष्यबळ मिळत नाही असे तुणतुणे वाजवणाऱ्या कुलगुरूंच्या प्रशासनाने नॅक तयारी व सादरीकरणासाठी जी समिती नेमली होती त्यात एक वगळता सर्वजण गोमंतकीय होते.

Sameer Panditrao

गोविंद गावडेंचे ‘स्टेटस’

‘बहुत जी लिया उनके लिये, जो मेरे लिये सब कुछ थे. अब जीता है उनके लिये जिनके लिए मै सब कुछ हूँ,’ हा आहे माजी मंत्री तथा प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी घातलेला स्टेटस सध्या हा स्टेटस चर्चेचा विषय ठरला असून यातला ‘उनके लिये’ म्हणजे कोणासाठी यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. कोणीही का असेना, पण गोविंदबाब आता या ‘स्टेटस’ ला फार उशीर झाला आहे, असं वाटत नाही का तुम्हाला? शेवटी तुमच्याच भाषेत सांगायचे तर ‘जिंदगी के सफर मे गुजर जाते है, जो मकाम वो फिर नही आते’ हेच खरे नाही का..? ∙∙∙

कुलगुरुंना चपराक

गोवा विद्यापीठाला ‘ए प्लस’ मानांकन मिळाले ही खरेतर कुलगुरु हरिलाल मेनन यांनी मोठी चपराक आहे. विद्यापीठात स्थानिक पातळीवर चांगले मनुष्यबळ मिळत नाही असे तुणतुणे वाजवणाऱ्या कुलगुरूंच्या प्रशासनाने नॅक तयारी व सादरीकरणासाठी जी समिती नेमली होती त्यात एक वगळता सर्वजण गोमंतकीय होते. त्यात विद्यादत्त वेरेकर, कौस्तुभ प्रियोळकर, राजेंद्र गाड, जीवन परब व प्रशासकीय पातळीवर मदतीसाठी बांदोडकर व गर्ग होते. त्यातील गर्ग वगळता सर्वजण गोमंतकीय होते. त्यामुळे ‘नॅक’ची ही श्रेणी ही कुलगुरुंच्या अपप्रचाराला चपराक असल्याचे विद्यापीठ वर्तुळात बोलले जात आहे. ∙∙∙

मास्‍तरांच्‍या भूमिकेत दामू

भाजपाचे प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक हे खरेतर बऱ्यापैकी कलाकार. आमदार झाल्‍यानंतरही त्‍यांनी फातोर्डा येथील दामोदर लिंग देवालयासमोर होणाऱ्या नाटकात भाग घेणे सोडले नव्‍हते. मात्र आता दामू प्रदेशाध्‍यक्ष झाल्‍याने सध्‍या त्‍यांना नवीन भूमिकेत वावरावे लागते आणि ती भूमिका म्‍हणजे, मास्‍तरकीची भूमिका. भाजप आता पूर्वीचा राहिलेला नाही. वेगवेगळ्‍या पक्षांतून आमदार आयात केल्‍यामुळे भाजपच्‍या या गाेटात नाठाळ आमदारांची संख्‍या वाढू लागली आहे. त्‍यामुळे दामूंना ही नवीन भूमिका निभावावी लागत आहे. काहींना चुचकारून तर काहींच्‍या डोक्‍यावर काठी हाणून सध्‍या ते ती भूमिका पार पाडत आहेत. निवडणूक येईंपर्यंत दामूंना काय काय करावे लागेल याची कल्‍पना आताच येऊ लागली आहे. झेेपेल का त्‍यांना ही नवीन भूमिका? ∙∙∙

कारण निवडणूक...

आगामी विधानसभा निवडणूकीला अद्याप दीड वर्षापेक्षा अधिक कालावधी उरला असला तरी, म्हापसा शहरात काँग्रेसमधील आतापासून काही नेते तयारीला लागलेत. यामध्ये विजय भिके, अ‍ॅड. शशांक नार्वेकर, सुधीर कांदोळकर यांचा प्रामुख्याने समावेश आहे. अजून एका महिला नेत्याच्या नावाची चर्चा आहे. परंतु, या मॅडमना म्हापशाऐवजी मांद्रेतच जास्त रुची आहे. या नेत्यांपैकी काहींनी बार्देशातील गटाध्यक्षांना हेरले आहे. जेणेकरुन, उद्या संबंधित गट समित्यांकडून आपल्या नावाला पसंती मिळावी, हा त्यामगचा हेतू! अशात नेमक्या कोणत्या नेत्याच्या गळ्यात तिकिटाची माळ पडते, हे वेळप्रसंगी समजेल. परंतु, सध्या म्हापशात काँग्रेसचे नेतेमंडळी आपापल्यापरीने राजकीय रणनीती खेळताहेत. परिणामी पक्षापेक्षा अनेक नेते स्वतःचे राजकीय हित जोपासण्यावर भर देताहेत, असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटते. ∙∙∙

दामूंचे लक्ष्य ‘झेडपी’

राज्यातील जिल्हा पंचायत निवडणूक येत्या डिसेंबरमध्ये होणार असल्याने भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत आपले सर्वच उमेदवार कसे निवडून येतील, याकडे कटाक्ष ठेवला आहे. विशेष म्हणजे दामू नाईक हे भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांना प्रथमच निवडणुकांना सामोरे जावे लागणार असल्याने त्यांच्यादृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे, त्यामुळेच या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार भाजपचेच कसे निवडून येतील, याकडे दामूबाबनी लक्ष केंद्रीत केले आहे. आता त्यासाठी ‘मगो’शी युती करणार की नाही हे समजू शकले नाही तरी त्याबाबतची शक्यताही नाकारता येत नाही. ∙∙∙

विद्यापीठाचा फलक कुठेय?

गोवा विद्यापीठाला नॅक समितीने ‘ए प्लस’ श्रेणी मिळाली ही राज्यासाठी कौतुकाची नक्कीच बाब आहे. परंतु पेपरफुटी प्रकरणामुळे न्या. खांडेपारकर समितीने विद्यापीठाची अब्रू चव्हाट्यावर आणली आहे. विद्यापीठाचे प्रशासनासाठी एकीकडे खुशी तर एकीकडे गम, अशा स्थितीत काम करावे लागत आहे. नॅक समितीच्या निरीक्षणाला विद्यापीठ उत्तीर्ण झाले असले तरी या विद्यापीठाचा ‘गोवा विद्यापीठ’ असा दिशा दर्शविणारा फलक कुठेच दिसत नाही. ज्याप्रमाणे इतर राज्यात विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर कमान दिसते, तशी कमान येथे नाही. प्रशासकीय इमारतीवरही ‘गोवा विद्यापीठ'' असे दर्शविणारा फलक रस्त्यावरून कुठेच दिसत नाही. त्यामुळे ताळगाव पठारापासून सुरू झालेला हा परिसर सांताक्रूझच्या श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमपर्यंत विद्यापीठाचा परिसर आहे, परंतु गोवा विद्यापीठ, असे लिहिलेले एका फॅकल्टीकडे जाणाऱ्या मार्गावर दिसून येते. त्यामुळे काही काळात राज्यातील एकमेव विद्यापीठाचा नामफलक तरी दिसेल, अशी अपेक्षा करुया. ∙∙∙

पितळ झाले उघडे!

नॅकचे पथक पाहणीसाठी आले असताना १५ वर्षे वास्तव्याच्या अटीमुळे चांगले मनुष्यबळ विद्यापीठाला मिळत नाही, असा कांगावा कुलगुरु हरिलाल मेनन यांनी केला होता. विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेवर असलेल्या केरळमधील एकानेही हाच सूर आळवला होता. यामागे गोवा विद्यापीठाचे रुपांतर केंद्रीय विद्यापीठात करण्याचा डाव होता, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. नॅककडूनच विद्यापीठाचे रूपांतर केंद्रीय विद्यापीठात करण्याची शिफारस मिळावावी अशी ही धडपड असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात ऐकू येऊ लागली आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सांगेत 14 वर्षांपासून जीवघेण्या लाकडी पुलावर धोकादायक प्रवास; आदिवासी बांधवांची व्यथा दुर्लक्षित!

IND vs ENG: रेकॉर्डब्रेकर गिल! मँचेस्टरमध्ये शुभमन करणार मोठा धमाका; 19 वर्ष जुना रेकॉर्ड निशाण्यावर

Ishan Kishan Dance Video: 'सॉरी सॉरी' गाण्यावर इशान किशनचा भन्नाट डान्स; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, 'वाह क्या बात है...'

Kerala Temple Crocodile: मंदिराचे रक्षण करणारी, प्रसाद खाऊन राहणारी 'मगर'; केरळच्या श्रीअनंत पद्मनाभ मंदिरातील अद्भुत गोष्ट

सोन साखळीनं केला घात! एमआरआय मशीनने खेचलं अन् क्षणात 'त्याचा' मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT