Traffic Rule Dainik gomantak
गोवा

Goa Traffic Rule: वाहनचालकांनो सावधान! ‘एआय’ कार्यरत; महिनाभरात झालीय तब्बल 'एवढ्या' मोठ्या रकमेची वसुली

एका महिन्यातील कारवाई : 5, 539 जणांना दंड; वेगमर्यादेची प्रकरणे अधिक

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) यंत्रणेद्वारे वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात झाली असली तरी अनेकजण वेगमर्यादेचे पालन करत नसल्याचे आढळले आहे.

जून महिन्यात या यंत्रणेद्वारे नियमांचे उल्लंघन केलेल्या ५,५३९ जणांवर कारवाई करत ४२ लाखांचा दंड वसूल केला. यामध्ये अर्ध्याहून अधिक (२,८८९) वाहनचालकांनी वेगमर्यादेचे उल्लंघन केले आहे.

वाहतूक खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यंत्रणेद्वारे सिग्नल तोडून जाणे, थांबा असलेल्या सीमारेषा न पाळणे तसेच हेल्मेट घालणे याबाबत शिस्त आली आहे. प्रत्येक दिवशी सरासरी 200 हून अधिकजणांविरुद्ध कारवाई केली जाते.

सुट्टीच्या दिवशी हे प्रमाण कमी असते. राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील वेगमर्यादेवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही ठिकाणी स्पीड रडार गन्स लावले आहेत.

रस्त्याच्या बाजूने वेगमर्यादेचे फलक लावलेले नाहीत. मात्र, कोणत्या भागात किती वेगमर्यादा लागू आहे, याविषयी जागृती तसेच प्रसिद्धी केली आहे.

घरच्या पत्त्यावर दंडाची नोटीस

ज्या भागात राज्य व राष्ट्रीय महामार्ग आहेत, त्या वाहतूक पोलिस कक्षांना स्पीड रडार गन्स प्रदान केल्या आहेत. मात्र, काही ठिकाणी वेगमर्यादा फलक नसल्याने कारवाईत अडथळे येत आहेत.

केंद्रीय निधीतून मिळालेल्या या स्पीड गन्स अत्याधुनिक असल्याने सुमारे २०० मीटरवरील वाहनाचा वेग नोंदवण्याची क्षमता त्यामध्ये आहे.

ही कारवाई करण्यासाठी वाहनचालकांना थांबवल्यास वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यामुळे त्यांना घरच्या पत्त्यावर दंडाची नोटीस पाठवली जाते.

...तर चलन न्यायालयाकडे :

कारवाई केलेल्या वाहनमालकांना मेसेज पाठवताना त्यांच्याविरुद्ध कोणत्या नियमाचे उल्लंघन केले आहे, याचीही माहिती दिली जात आहे. जे कोणी दंडाची रक्कम जमा करत नाहीत, त्यांचे चलन पुढील कारवाईसाठी न्यायालयाकडे पाठविले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: पावसाचा जोर वाढणार? 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी; प्रशासन सतर्क

Goa Traffic News: पालकांनो सावधान! अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास होणार कारवाई; 'सायलेंसर'चा आवाज करणाऱ्यांना होणार जबर शिक्षा

Advalpal: अडवलपाल कोळमवाडा येथे रस्त्याची कडा कोसळली

गोवा बीचवर बायकोशी झाला वाद, नवऱ्याने जीव द्यायला समुद्रात घेतली धाव; मदतीला आलेल्या जीवरक्षकालाही केली मारहाण

Karnataka Bus Accident: भीषण अपघात! बस लॉरी ट्र्कवर जाऊन आदळली; तिघांचा जागीच मृत्यू, 7 जण गंभीर

SCROLL FOR NEXT