Rohan Khaunte पर्यटन क्षेत्राशी निगडित विविध व्यवसायांतील अंदाधुंदीवर आळा घालणे आवश्यक आहे. असा बेकायदेशीरपणा असल्यास आपोआप महसूल गळती होते. त्यामुळे हा बेकायदेशीरपणा बंद होणे आवश्यक आहे.
त्यासाठी कडक कायदे अंमलात आणले जाणार आहेत. येत्या अधिवेशनात हा कायदा सादर केला जाणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली.
‘गोमन्तक टीव्ही’वरील ‘सडेतोड नायक'' कार्यक्रमात संपादक-संचालक राजू नायक यांनी खंवटे यांच्याशी राज्यातील ‘पर्यटन धोरण आणि पुढील दिशा’ या विषयावर चर्चा केली. खंवटे म्हणाले, पर्यटनाविषयी कायदा झाल्यावर या बजबजपुरीला आळा बसणार आहे.
पर्यटनाशी निगडित असलेल्या सर्व बाबी या कायद्याखाली येणार आहेत. विविध कायद्यांविषयी काम करणाऱ्या दिल्लीच्या ‘नाल्सर’ संस्थेकडून या कायद्याचा मसुदा तयार केला आहे.
हा कायदा अंतिम टप्प्यात असून, येत्या अधिवेशनात तो सादर केला जाईल. या कायद्यामुळे दंड आकारणीही करणे सोपे होणार आहे.
दर्जा आणि संख्या हे सूत्र साध्य करण्यासाठी सर्व क्षेत्रांतील स्थानिक व्यावसायिकांना (स्टेक होल्डर्स) एकत्रित येणे आवश्यक आहे. अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून पर्यटनाकडे पाहिले जाते.
त्याशिवाय दरडोई उत्पादनातही या क्षेत्राचा मोठा वाटा आहे. आता पूर्वीसारखे गोवा हे पर्यटनस्थळ राहिलेले नाही.
आपले अखंडत्व सांभाळताना शेजारील राज्यांशी स्पर्धा आहे. गोव्याची यापूर्वीची ओळख किनारे, तसेच पार्टी लाईफ, नाईट लाईफ अशी होती.
‘दक्षिण काशी’
उत्तर काशी म्हणून ज्याप्रकारे उत्तराखंडमधील देवस्थाने ओळखली जातात, त्याच धर्तीवर गोव्याची पर्यटन क्षेत्रात ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळख व्हावी, यासाठी आपला प्रयत्न आहे. नव्या पर्यटन धोरणानुसार राज्यात आध्यात्मिक आणि ग्रामीण पर्यटनावर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचे खंवटे म्हणाले
धोरण हवेच!
पुढील काही वर्षांचा विचार करून पर्यटनाची दिशा बदलणे शक्य आहे काय? त्यावर खंवटे म्हणाले की, नेमके आव्हान कुठे आहे ते स्थानिक व्यावसायिकांनी समजून घ्यायला हवे.
आम्हाला पर्यटन धोरण आणि कायदा हवा आहे. गोव्याला पर्यटनाचे मुख्य स्थान समजले जात असलो, तरी कायदा नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.