पोर्तुगीज कायद्याचे अभ्यासक मनोहर उसगावकर कालवश

1996 ते 1998 पर्यंत ते भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तर मार्च 1999 ते ऑक्टोबर 1999 या कालावधीत राज्याचे ॲडव्होकेट जनरल होते.
Adv. M.S. Usgaonkar Passed Away
Adv. M.S. Usgaonkar Passed AwayDainik Gomantak
Published on
Updated on

Manohar Usgaonkar passed away नामांकित ज्येष्ठ वकील, पोर्तुगीज कायद्याचे जाणकार तसेच राज्याचे माजी महाधिवक्ता (ॲडव्होकेट जनरल) मनोहर सिनाई उसगावकर (वय ९० वर्षे) यांचे शुक्रवारी सकाळी पणजीतील त्यांच्या पुत्राच्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी १२ वाजता सांतिनेझ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या मागे सुदिन, सुहर्ष, सुदेश हे तीन पुत्र तसेच इतर सदस्य आहेत. सुदिन आणि सुदेश हे वडिलांचा वकिलीचा वारसा चालवत आहेत.

Adv. M.S. Usgaonkar Passed Away
Rohan Khaunte: अधिवेशनात पर्यटन व्यवसायांसंबंधी घेणार 'महत्वाचा' निर्णय

अंत्यसंस्कारावेळी माजी केंद्रीय न्यायमंत्री रमाकांत खलप, उद्योजक अनिल खंवटे, ज्येष्ठ-कनिष्ठ वकील तसेच मित्रमंडळी उपस्थिती होती.

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांनी त्यांच्या घरी जाऊन पार्थिवाचे दर्शन घेतले आणि उसगावकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझिस, ज्येष्ठ वकील एस. रिवणकर उपस्थित होते.

ॲड. उसगावकर यांचा जन्म २३ सप्टेंबर १९३३ रोजी झाला. त्यांनी १९५७ मध्ये कायद्याची पदवी मिळवली.

१९९६ ते १९९८ पर्यंत हे भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तर मार्च १९९९ ते ऑक्टोबर १९९९ या कालावधीत राज्याचे ॲडव्होकेट जनरल होते. त्यांनी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे मानद सदस्य म्हणूनही काम केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com