Goa Traffic Police Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Police: दुचाकीस्वारांबाबत गोवा वाहतूक पोलिसांनी घेतलाय 'हा' महत्वाचा निर्णय

अपघात वाढत असल्याने आता दुचाकी चालकासह पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Traffic Police राज्यात गत 20 दिवसांत 7 दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू झाला आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर गोवा पोलिसांनी महत्त्वपूर्ण नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापुढे दुचाकीचालकासह त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीनेही हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात येत असल्याचे वाहतूक पोलिस अधीक्षक बोसुएट दा सिल्वा यांनी सांगितले.

राज्यातील बहुतांश दुचाकीचालक हेल्मेटचा वापर करतात. मात्र, पाठीमागे बसलेली व्यक्ती ते वापरत नाही. याकडे पोलिसांनीही आतापर्यंत कानाडोळा केला होता.

पण अपघात वाढत असल्याने आता दुचाकी चालकासह पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. दुचाकीस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीनं हेल्मेट परिधान केलेलं नसेल तर कारवाई केली जाईल.

काय काय सांगतो?
मोटार सायकल चालवणारी आणि त्याच्या पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीनेही हेल्मेट परिधान करणे हे वाहन कायदा 1988 कलम 126 सह 194 (ड) अन्वये बंधनकारक आहे.

विनाहेल्मेट मोटारसायकल चालविल्यास नवीन वाहन कायद्यानुसार 1 हजार रुरुपये दंडाची तरतूद आहे. तसेच तीन महिन्यांसाठी वाहन परवाना निलंबीत केला जाऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT