Kiteboarding: काईटबोर्डिंगमध्ये चारही शर्यती जिंकत आशिष रॉयची दमदार कामगिरी

स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असलेल्या ट्वीन टिप क्लासमधील शर्यतींना शनिवारी सुरवात होईल.
Kiteboarding
KiteboardingDainik Gomantak
Published on
Updated on

National Kiteboarding Competition भारतीय राष्ट्रीय काईटबोर्डिंग स्पर्धेत शुक्रवारी आशिष रॉय याने सुसाट कामगिरी बजावताना दिवसभरातील चारही शर्यती जिंकल्या.

स्पर्धेला मांद्रे समुद्रकिनारी सुरवात झाली. स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असलेल्या ट्वीन टिप क्लासमधील शर्यतींना शनिवारी सुरवात होईल.

या प्रकारात पुरुषांत वरुण नारायणन, अर्जुन मोथा, मार्क यांच्यात, तर महिलांत कॅरोलिन, गोव्याची केओना रजनी यांच्या चढाओढ अपेक्षित आहे. ऑलिंपिक मान्यता असलेल्या फॉर्म्युला काईटबोर्ड क्लास स्पर्धेतही चुरस असेल.

Kiteboarding
Panaji Hit And Run Case: मेरशी येथील हिट अ‍ॅन्ड रन प्रकरणी आरोपी नागेश बंदीला जामीन मंजूर

प्रीमियर काईटबोर्डिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यातर्फे एकावेळी पहिला आंतरराष्ट्रीय काईटबोर्डिंग व दुसऱ्या राष्ट्रीय काईटबोर्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 21 स्पर्धकांची नोंदणी झाली. त्यात 14 भारतीय, तर दोघा महिलांसह सात आंतरराष्ट्रीय सेलर्सचा समावेश आहे.

Kiteboarding
Sail Goa Yachting: डेन, जेरोम यांच्यात चुरस तर महिलांच्या आयक्यू फॉईलमध्ये कात्याचा दबदबा

स्पर्धेचे शुक्रवारी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी आदित्य देशप्रभू, प्रीमियर काईटबोर्डिंग असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सीझर मिनेझिस यांची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com