Goa Traffic Police Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Police: गैरवर्तणूक की IPS अधिकाऱ्याच्या मित्रांवर कारवाई भोवली? चार पोलिसांची तडकाफडकी बदली

Goa Reserve Police: चौकशीच्या काळात त्यांची बदली गोवा राखीव पोलिस दलात (जीआरपी) करण्यात आली. त्यांच्यावरील आरोपामध्ये चौकशीत ते दोषी आढळून आल्यास योग्य ती कारवाई केली जाईल

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Traffic Police

पणजी: नियम मोडल्याच्या नावाखाली चार वाहतूक पोलिसांनी पर्यटकांना अडवून केलेली कारवाई नियमाचे उल्लंघन करणारी होती. त्यामुळे त्याची चौकशी उत्तर गोवा पोलिस उपअधीक्षकांमार्फत करण्यात येत आहे. या चौकशीच्या काळात त्यांची बदली गोवा राखीव पोलिस दलात (जीआरपी) करण्यात आली. त्यांच्यावरील आरोपामध्ये चौकशीत ते दोषी आढळून आल्यास योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती वाहतूक पोलिस अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी दिली.

ड्युटीवर असलेल्या एका साहाय्यक उपनिरीक्षक राजन म्हामल व तीन पोलिस हवालदार विश्राम मलिक, संजय गावडे व रुपेश राऊत हे हडफडे येथील परिसरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर नजर ठेवून होते.

गोव्यात (Goa) आयपीएस असलेल्या अधिकाऱ्याची ओळख असलेले तरुण युवक दोन वेगवेगळ्या दुचाकीवरून फिरत होते. त्यातील एका दुचाकीवर दोनपेक्षा अधिक स्वार असल्याने पोलिसांनी त्यांना अडवले. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली असता या युवकांनी आपली गोव्यात असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याशी असलेली ओळख सांगण्यात सुरुवात केली. मात्र पोलिस आपल्या निर्णयाशी ठाम राहिले. पोलिसांनी त्यांच्याकडून पैसे मागितले नाहीत तसेच अरेरावीची भाषा वापरली नाही.

गैरवर्तणुकीचा आरोप

दरम्यान, या प्रकरणाची दखल गोव्यातील या युवकांशी ओळख असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याने घेऊन त्याची चौकशी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार ही चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्याविरुद्ध पर्यटकांशी गैरवर्तणूक केल्याचा कथित आरोप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT