Goa Traffic Fines Enforcement Dainik Gomantak
गोवा

आता नाही चालणार 'वशिला' किंवा 'माफी'! बेफाम ड्रायव्हिंग करणाऱ्यांची आता खैर नाही; वाढत्या अपघातांना ब्रेक लावण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये

Goa Traffic Fines Enforcement: वाहतूक नियमांच्‍या उल्लंघनासाठीच्‍या दंडांत करण्‍यात आलेल्‍या वाढीची राज्‍यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्‍याचा ठाम निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्‍यातील वाढत्‍या अपघातांच्‍या पार्श्वभूमीवर, वाहतूक खात्‍याने काही वाहतूक नियमांच्‍या उल्लंघनासाठीच्‍या दंडांत करण्‍यात आलेल्‍या वाढीची राज्‍यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्‍याचा ठाम निर्णय घेतला आहे. त्‍यामुळे वाहन चालकांना भान ठेवून वाहने चालवावी लागणार आहेत.

वाहतूक खात्‍यातर्फे आयटीएमएस कॅमेऱ्यांद्वारे वाहतुकीवर लक्ष ठेवण्‍यात येते. यापुढे अशा कॅमेऱ्यांमध्‍ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारी जी वाहने कैद होतील, त्‍यांच्‍यावर तत्‍काळ दंडात्‍मक कारवाई होईल, असे खात्‍याने म्‍हटले आहे.

वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, ट्रॅफिक सिग्‍नचे पालन न करणे, भरधाव वेग, अनधिकृत ठिकाणी पार्किंग, धोकादायक पद्धतीने ओव्‍हरटेक करणे आदींसारख्‍या कारणांमुळे राज्‍यातील अपघातांत गेल्‍या काही वर्षांपासून सातत्‍याने वाढ होत आहे. त्‍यात मृत पावणाऱ्यांची तसेच जखमी होणाऱ्यांची संख्‍याही वाढत चालली आहे. त्‍यामुळे वाहतूक खात्‍याने वाढीव दंडाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून अपघात रोखण्‍याचे प्रयत्‍न सुरू केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT