Goa tourism controversy Dainik Gomantak
गोवा

"मला नोकरांसारखं वागवलं, शिवीगाळ केली", भाजीपाव खाताना पर्यटकाला आला 'वाईट' अनुभव; रेडिटवरील Post Viral

Goa tourist bad experience Reddit: रेडिट नावाच्या सोशल मीडियावर सध्या अशीच एक पोस्ट चर्चेत आहे, ज्यात एका पर्यटकाने आपला गोव्यातील अनुभव बिकट असल्याचा दावा केला

Akshata Chhatre

Goa tourist experience reddit viral post: पर्यटकांसाठी कायमच आकर्षण ठरलेल्या गोव्याची प्रतिमा काहीशी डागाळतेय की काय, असा प्रश्न निर्माण होतोय. काही पर्यटक गोव्याचे, गोव्यातील स्थानिकांचे कौतुक करतात, तर काही पर्यटक गोव्यातील अनुभव वाईट असल्याचं सांगतात. रेडिट (Reddit) नावाच्या सोशल मीडियावर सध्या अशीच एक पोस्ट चर्चेत आहे, ज्यात एका पर्यटकाने आपला गोव्यातील अनुभव बिकट असल्याचा दावा केलाय. या पोस्टमध्ये काय खरं आणि काय खोटं हे मात्र गुलदस्त्यात आहे.

या पोस्टनुसार, हा पर्यटक ३९ वर्षांचा भारतीय व्यक्ती असून, गेल्या ८ महिन्यांपासून गोव्यात राहतोय. त्याने सिंगापूर, थायलंड, इंडोनेशिया आणि दुबईसारख्या देशांनाही भेटी दिल्या आहेत. तो सांगतो की, गोव्यातील लोकं बाहेरचे पर्यटक चांगले नाहीत अशी तक्रार करतात आणि हेच पर्यटक गोव्यात घाण करतात अशा तक्राराई देखील करतात, पण स्थानिकांच्या उद्धट आणि शत्रुत्वपूर्ण वागण्याबद्दल काय? असा प्रश्न त्याने उपस्थित केलाय.

हा पर्यटक स्वतःला एक सभ्य व्यक्ती मानतो, तो दारू पिऊन वाहन चालवत नाही, स्थानिक संस्कृतीचा आदर करतो आणि नेहमीच सर्वांसोबत हसमुख असतो. त्याच्या मते, गोवा इतर देशांच्या तुलनेत स्वस्त नाहीये, आणि तो येथे स्थानिक रोजगारही हिसकावून घेत नाहीये. तरीही स्थानिक लोक त्याच्याशी इतके उद्धट आणि शत्रुत्वपूर्ण वागतात, याचेच त्याला आश्चर्य वाटते.

या पोस्टमध्ये त्याने एक अनुभव सांगितला आहे. एका दिवशी त्याला हरमलमध्ये स्थानिक भाजी-पाव खायचा होता, तेव्हा एका स्थानिक वृद्ध व्यक्तीने त्याला थेट शिवीगाळ केली आणि काही अपमानास्पद शब्द सुद्धा वापरले आणि हे घडत असताना आजूबाजूचे २-३ स्थानिक लोक त्यावर हसत होते. हा प्रकार त्याला खूप अपमानास्पद वाटला, जणू आपण काही परप्रांतीय कामगार आहोत आणि येथे नोकर म्हणून आलो असल्याचा भास झाल्याचं तो लिहितो. तो पुढे म्हणतो की, मी माझ्या नोकरांशीसुद्धा अशाप्रकारे बोलत नाही. त्याला त्या दिवशी खूप वाईट वाटले आणि मन अस्वस्थ झाल्याचे त्याने लिहिलेय.

घडलेल्या प्रकरणावर त्याने त्वरित प्रतिक्रिया का दिली नाही, याचे कारणही त्याने स्पष्ट केलेय. तो म्हणतो की त्याला मानसिक शांतता हवी आहे आणि कोणत्याही वादात पडायचे नाही. मात्र गोव्यातील स्थानिक दुकानदारांचे आणि रेस्टॉरंट मालकांचे वर्तनही खूप उद्धट असते, जणू काही ते आलेल्या पर्यटकांना फुकट खायला देत आहेत. आम्हाला स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि कारागिरांना मदत करायची असते, पण स्थानिक लोकांचे हे वागणे आम्हाला बाहेरच्या दुकानदारांकडून आणि रेस्टॉरंटमधून खरेदी करण्यास भाग पाडते, असे त्याने नमूद केलेय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Surya Grahan Horoscope: सूर्यग्रहण आणि शनीची दृष्टी; 'या' राशींसाठी वरदान ठरेल, पण काही राशींना सावध राहावं लागेल

मंत्र्यांच्या चर्चा,'ओंकार' हत्तीचा धुमाकूळ! सलग तिसऱ्या दिवशी शेतात ठिय्या; वनखातं काय करतंय? शेतकऱ्यांचा सवाल

IND vs PAK: टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी की गोलंदाजी? भारतासाठी कोणता पर्याय बेस्ट? हाय होल्टेज सामन्याची उत्सुकता शिगेला; जाणून घ्या दुबई पिच रिपोर्ट

Eknath Shinde's 'X' Account Hacked: उपमुख्यमंत्र्यांचे ट्विटर अकाऊंट हॅक; हॅकर्सनी पाकिस्तान, तुर्कीच्या झेंड्याचे फोटो केले पोस्ट शेअर

Shardiya Navratri 2025: घटस्थापना कधी आणि कोणत्या शुभ मुहूर्तावर करावी? जाणून घ्या संपूर्ण पूजा पद्धती

SCROLL FOR NEXT