Tourism Minister Rohan Khaunte On Home Stay Policy Dainik Gomantak
गोवा

Rohan Khaunte: होम स्टे, कॅराव्हॅन धोरण महिन्याभरात; धनुष्यबाण आकाराची इमारत, डिजिटल नोमॅड व्हिसासाठी प्रयत्न...

पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांची पीटीआयला मुलाखत; डिचोलीत होम स्टेमधील 100 घरे

Akshay Nirmale

Tourism Minister Rohan Khaunte On Home Stay Policy: पर्यटकांना गोव्याच्या पर्यटनाच्या मध्यवर्ती आणण्याच्या दृष्टीने तसेच पर्यटकांना गोव्याची खरी संस्कृती अनुभवता यावी यासाठी नवीन होम स्टे पॉलिसी तसेच कॅराव्हॅन पॉलिसी महिनाभरात लागू करणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली आहे.

खंवटे म्हणाले, गोवा पर्यटन 2.0 च्या व्हिजननुसार आमचे लक्ष पर्यटकांच्या प्रमाणापेक्षाही पर्यटकांच्या गुणवत्तेवर आहे.

चांगले, जबाबदार आणि कायमस्वरूपी पर्यटक आम्हाला हवे आहेत. जे निसर्गाचा आदर करतात आणि स्थानिक संस्कृतीशी सुसंगत ज्यांचे वर्तन असते. पर्यटकांच्या संख्येचा नंबरगेम थांबला पाहिजे.

पार्टी लाईफ, समुद्रकिनारे याहूनही गोव्याची वेगळी ओळख आहे. गोवा म्हणजे समृद्ध परंपरा, समृद्ध संस्कृती, उत्तम खाद्यपदार्थ, उत्तम लोक, उत्तम इको-टुरिझम, साहसी खेळांच्या भरपूर संधी अशी गोव्याची ओळख आहे. आम्ही #GoaBeyondBeaches या हॅशटॅगसह पुढे जात आहोत.

गोवा पर्यटन 2.0 मध्ये ग्रामीण पर्यटन, इको-टुरिझम आणि अंतर्भागाचे पर्यटन (Hinterland Tourism) यांचा समावेश आहे. यातून आम्ही आमचे विविध सण, उत्तम परंपरा, उत्तम भोजन, होमस्टे, अध्यात्म यांना एकत्रित जोडू इच्छितो.

डिचोलीत होम स्टेमधील 100 घरे

होमस्टे धोरण पर्यटकांना थेट गोव्याच्या मध्यभागी घेऊन जाईल आणि त्यांना गोव्याच्या वास्तविक परंपरा आणि संस्कृतीचा अनुभव घेता येईल. या धोरणात पहिल्या टप्प्यात 100 घरांची रूपरेषा तयार केली जाईल. जी केवळ ग्रामीण पट्ट्यात, डिचोलीसारख्या भागात असेल.

Airbnb सोबत सामंजस्य करार

होमस्टेमुळे लोकांना स्थानिक संस्कृती, परंपरा, सण, पाककृती आणि बरेच काही अनुभवता येईल. यासाठी आम्ही Airbnb सोबत सामंजस्य करार केला आहे. Airbnb अशा मालमत्तांच्या मालकांना क्षमता वाढवण्याबाबत प्रशिक्षण देणार आहे.

कॅराव्हॅन धोरण

कॅराव्हॅन धोरणात ऑपरेटर्स असतील. एखाद्या हॉटेलमध्ये राहिल्यामुळे प्रवासाच्या कार्यक्रमात अडथळा येणार नाही.कॅरव्हान पार्क उभारले जाईल. तिथे युटिलिटीज, स्वच्छता, सेवा, वाहन चार्जिंग पॉइंट्स असतील.

खंवटे म्हणाले की, गोव्यात खूप जुनी मंदिरे, चर्च आहेत, त्याचा इतिहास समृद्ध आहे. आमच्याकडे सप्तकोटेश्वर मंदिर आहे, धबधबे आहेत. गोव्याला योग्य अर्थाने 365 दिवसांचे डेस्टिनेशन करण्याचा प्रयत्न आहे. गोवा हे आता केवळ हंगामी पर्यटन स्थळ राहिलेले नाही.

धनुष्यबाण आकारातील इमारत...

गोव्याला 'परशुराम भूमी' म्हणतात. पुराणांनुसार भगवान परशुरामांनी बाण सोडला आणि समुद्र दूर लोटला गेला. ज्यातून 'गोवा' उदयास आला. येथे समुद्रकिनारी धनुष्यबाणाच्या आकाराची इमारत उभारण्याची योजना आहे.

त्यात विविध नागरी सुविधा असतील. या प्रकल्पासाठी समुद्र किनाऱ्यालगत 10 ते 15 एकर जमीन लागेल. केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन मंत्रालयांकडूनही त्यासाठी मदतीची अपेक्षा आहे.

डिजिटल नोमॅड व्हिसा

खंवटे म्हणाले, जगभरात 'डिजिटल नोमॅड'ची संख्या वाढत चालली आहे. 46 देशांमध्ये ही संकल्पना आहे.

यात लोकांना (ज्यांना वर्क फ्रॉम होम करायेच आहे किंवा घराबाहेरून काम करायचे आहे) क्रिएटिव्ह स्पेस, आणि क्वालिटी ऑफ स्पेस हवी असते. आणि गोव्यात हे सर्व आहे.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने यासाठी डिजिलट नोमॅड व्हिसा द्यावा, यासाठी बोलणी सुरू आहेत. व्हिसा मंजूर झाला तर दीर्घकाळासाठीचे अनेक पर्यटक गोव्याला मिळतील. ते होम स्टे धोरणाला पूरक ठरतील. अर्थव्यवस्थेला हातभार लावतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

समुद्री मार्ग झाला खुला! 7 वर्षांनंतर मुरगाव पोर्टवर सुरू होणार कंटेनर सेवा, निर्यातदारांना मोठा दिलासा

World Record! 11 चेंडूत 8 षटकार... युवा फलंदाजानं ठोकलं सर्वात जलद अर्धशतक, स्फोटक फलंदाजीचा VIDEO पाहाच

Viral Video: 'ओंकार' हत्तीची शेतात अचानक एन्ट्री... म्हशींनी जीव वाचवण्यासाठी ठोकली धूम, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Gujarat ATS Foils Terror Plot: मोठा दहशतवादी कट उधळला! गुजरात एटीएसने अहमदाबादमध्ये शस्त्रसाठ्यासह तिघांना ठोकल्या बेड्या; दहशतवादी नेटवर्क हादरले VIDEO

मासेविक्री बाजाराची दुरवस्था कायम, माशांच्या तुटवड्याने दर गगनाला भिडले; विक्रेत्यांचा SGPDA वर संताप

SCROLL FOR NEXT