ख्रिसमसपासून वर्षाअखेर आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्त्याने गोव्यात गर्दी होत आहे. मुंबई गोवा महामार्ग गाड्यांनी भरलेला आहे. असे वातावरण असताना रेडिट या प्लँटफॉर्मवर एका युजरने गोव्याबद्दल मत व्यक्त केले आहे ज्यावर जोरदार चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे. यात त्याने पर्यटन, टॅक्सी या विषयांवर मत मांडले आहे.
तो युजर पोस्टमध्ये म्हणतो कोविडनंतर गोव्याची मजा नाहीशी होत चालली आहे. २०२५ मधली या वर्षीची परिस्थिती आतापर्यंतची सर्वात वाईट वाटत आहे. याबाबत त्याने काही कारणे नमूद केली आहेत.
१.सर्वत्र फसवणूक, विशेषतः पर्यटकांना लक्ष्य केले जात आहे
२. काही लोकांचे उद्धट वर्तन
३. टॅक्सी माफियामुळे कमी अंतराचा प्रवासही त्रासदायक आणि खूप महाग झाला आहे
४. अन्नपदार्थ प्रचंड महाग झाले आहेत, पण त्यांची गुणवत्ता किमतीच्या तुलनेत अजिबात चांगली नाही
५. सामान्य हॉटेल्समध्येही राहण्याचा खर्च वाढला आहे
६. एका क्लबमधील आगीची घटना आणि अनेक क्लब बंद झाल्यामुळे, उरलेली नाइटलाइफही संपुष्टात आली आहे
७. दूरच्या राज्यांतून येणाऱ्या लोकांसाठी विमानाची तिकिटे अवास्तव महाग झाली आहेत
ही कारणे देऊन तो म्हणतो की, जे ठिकाण एकेकाळी शांत, स्वागतार्ह आणि मजेदार वाटायचे, ते आता तणावपूर्ण, महाग आणि निरुत्साहपूर्ण वाटते. ज्या गोव्याच्या प्रेमात लोक वर्षांपूर्वी पडले होते, ते आता अस्तित्वात नाही असे वाटते — किमान या हंगामात तरी नाही.
यावर अनेक लोकांनी चांगल्या वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही स्थानिकांनी त्याचे मुद्दे खोडूनही काढले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.