Ro-Ro Ferry In Goa Dainik Gomantak
गोवा

Ro-Ro Ferry In Goa: नदी परिवहनच्या 'रो-रो' फेरीबोटीची झुआरी नदीत चाचणी; एक फेरीबोट लवकरच सेवेत दाखल, दुसऱ्या बोटीचे काम पूर्णत्वाकडे

Ro-Ro Ferry: नदी परिवहन विभागाकडून (आरएनडी) जलमार्गावर लवकरच रोल-ऑन/रोल-ऑफ (रो-रो) फेरीबोट सेवा सुरू करण्यात येणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: नदी परिवहन विभागाकडून (आरएनडी) जलमार्गावर लवकरच रोल-ऑन/रोल-ऑफ (रो-रो) फेरीबोट सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी वेर्णा येथील विजय मरीन कंपनीने तयार केलेल्या रो-रो फेरीबोटींची झुआरी नदीत चाचणी घेण्यास सुरवात केली आहे.

दोनपैकी एका रो-रो फेरीबोटीची बांधणी झालेली आहे. दुसऱ्या बोटीची बांधणीही अंतिम टप्प्यात आली आहे. बांधणी झालेल्या रो-रो फेरीबोटीचे अजून काही चाचण्या घेऊन त्या नदी परिवहन खात्याकडे हस्तांतरीत केल्या जाणार आहेत.

या बोटीविषयी नदी परिवहनचे संचालक विक्रमसिंह राजेभोसले यांनी सांगितले की, नदी-आंतर-नदी कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी आणि रस्ते वाहतूक कमी करण्यासाठी केरळच्या धर्तीवर डिझाईन केलेल्या रो-रो फेरीबोट सेवा गोव्यातही सुरू करण्याचा सरकारने निर्णय घेतला. मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पुढाकार घेत या फेरीबोटींची बांधणी तत्काळ व्हावी यासाठी सतत पाठपुरावा केला. त्यामुळे लवकरच या बोटी गोमंतकीयांच्या सेवेत दाखल होतील.

सन २०१७ पासून रो-रो फेरीबोट सेवा सुरू करण्याचे नदी परिवहन खात्याचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी मंत्री सुभाष फळदेसाई यांनी २-०२२ मध्ये शिष्टमंडळाला घेऊन केरळमध्ये जाऊन तेथील रो-रो फेरीबोट सेवेची पाहणी केली होती.

त्यानंतर त्या सेवेला गती आली आणि २०२३ मध्ये रो-रो फेरीबोटीसाठी सुमारे दहा कोटींची निविदा प्रक्रिया काढण्यात आली. त्यानुसार विजय मरीनला ही निविदा मिळाली आणि आता ही सेवा लवकरच जनतेच्या सेवेत दाखल होईल, अशी आशा आहे.

रायबंदर-चोडण जलमार्गावर प्रथम सेवा

ज्या ठिकाणी वाहनांची व प्रवाशांची अधिक गर्दी असते, त्या ठिकाणी या बोटी कार्यान्वित होतील. रायबंदर-चोडण या मार्गावर प्रथमतः ही रो-रो फेरी सेवा सुरू होईल. त्यासाठी विशेष जेटींची बांधणीही करण्यात आलेली आहे.

रायबंदर-चोडण मार्गावर सध्या पाच फेरीबोटी ठेवाव्या लागतात आणि त्या वळविण्यासाठी व मार्गस्थ होण्यासाठी वेळ जातो. तो वेळ व इंधनही रो-रो फेरीबोटीमुळे वाचणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT