Union Budget 2022 For Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्याला मिळणार 3152 कोटींचे अनुदान

श्रीपाद नाईक : डबल इंजिन सरकारमुळे विकासाला चालना; कॉंग्रेसच्या काळात हे अनुदान फक्त 432 कोटी होते

दैनिक गोमन्तक

पणजी: केंद्रामध्ये भाजपचे सरकार सत्तेवर असल्यामुळे गोव्यासाठी 2022 ते 2023 या वर्षासाठी 3,152 कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. यापूर्वी कॉंग्रेसच्या काळात 2013 -14 साली हे अनुदान फक्त 432 कोटी होते, अशी माहिती केंद्रीय पर्यटन व बंदर राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.(Goa to get Rs 3152 crore grant)

पणजी (Panjim) येथील भाजपच्या प्रचार कार्यालयातील पत्रकार परिषदेत श्रीपाद नाईक बोलत होते. यावेळी भाजपचे गोवा प्रभारी सी.टी. रवी उपस्थित होते. यावेळी नाईक म्हणाले, केंद्रात आणि राज्यात भाजपचे (BJP) डबल इंजिन सरकार सत्तेवर असल्यामुळे केंद्राकडून भरीव अनुदान मिळत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताचा पाया मजबूत करणारा आहे. गोव्यासाठी हा अर्थसंकल्प फारच लाभदायक आहे. 2014 ते 2020 या काळामध्ये चार हजार कोटींची आर्थिक मदत गोव्याला मिळाली. डबल इंजिन सरकारमुळे गोव्याचे अनुदान सातपटींनी वाढले, तर गोव्याचे दरडोई उत्पन्नही भाजप सरकारच्या काळात 2.58 लाखावरून 5.20 लाखापर्यंत वाढल्याचे नाईक यांनी सांगितले.

- गोव्याला भरीव आर्थिक मदत

यापूर्वी रेल्वेसाठी 20 हजार कोटींची तरतूद केली होती. ती आता 1.37 लाख कोटीपर्यंत वाढवली आहे. पोलिस खात्यासाठी 7,387 कोटी अनुदान देण्यात येत होते, ते आता 8.14 लाख कोटीपर्यंत मिळणार आहे. देशातील विविध राज्यांना आर्थिक मदतीसाठी एक लाख कोटींचे वाटप करण्यात येणार असून त्यात गोव्यालाही बराच निधी मिळणार आहे. एकूणच हा अर्थसंकल्प शेतकरी आणि इतर गरिबांना मदत करणारा असल्याचेही नाईक यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी 237 लाख कोटींची तरतूद

शेतकऱ्यांच्या (farmer) उत्पादनांसाठी आधारभूत किमतीसाठी 237 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पंतप्रधान गृहनिर्माण योजनेतून 80 लाख घरे बांधण्यात येणार असून प्रत्येक घरामध्ये स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी वेगळी तरतूद केली आहे. केंद्र सरकार आणि गोवा सरकारने केलेल्या विकासाचा फायदा येत्या निवडणुकीत भाजपला निश्चित मिळणार असून गोव्यात भाजपचे सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येणार असल्याचा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला.शेतकऱ्यांसाठी 237 लाख कोटींची तरतूद

शेतकऱ्यांच्या उत्पादनांसाठी आधारभूत किमतीसाठी 237लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पंतप्रधान गृहनिर्माण योजनेतून 80 लाख घरे बांधण्यात येणार असून प्रत्येक घरामध्ये स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी वेगळी तरतूद केली आहे. केंद्र सरकार आणि गोवा सरकारने केलेल्या विकासाचा फायदा येत्या निवडणुकीत भाजपला निश्चित मिळणार असून गोव्यात भाजपचे सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येणार असल्याचा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session:मंत्री माविनचे 'सांबा', 'कालिया' काय करतात हे त्यांना माहित नाही"

Viral News: तुम्ही म्हणाल 'शी.. घाण' पण, स्वीडिश प्रौढ मनोरंजन कंपनी कर्मचाऱ्यांना देतंय 30 मिनिटांचा खास ब्रेक, जाणून घ्या कारण

Starlink in india: एलन मस्क यांच्या कंपनीला भारतात ब्रेक! स्टारलिंकला फक्त 20 लाख कनेक्शनना परवानगी

Mumbai Goa Highway Traffic: LPG गॅस टँकर पुलावरुन खाली कोसळला! मुंबई-गोवा महामार्गावर 10 तासांपासून वाहतूक ठप्प

Kokedama: नारळाच्या काथ्यापासून विघटनशील, जपानी 'कोकेडामा' बनवणारी गोमंतकीय कलाकार 'लेखणी'

SCROLL FOR NEXT