नितीन गडकरी आज गोवा दौऱ्यावर; भाजपच्या जाहिरनाम्याचे करणार प्रकाशन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) भाजप उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार आहेत.
Nitin Gadkari
Nitin GadkariDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी आज रविवारी दुपारी 12 वाजता पक्षाचा जाहीरनामा सादर करणार आहेत.
पणजीतील एका हॉटेलमध्ये जाहीरनामा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Pramod Sawant), भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आदी यावेळी उपस्थित राहतील. (Goa BJP Election 2022)

Nitin Gadkari
गोव्यात 'आप'चे सरकार आल्यास लोक इतर राजकीय पक्षांना विसरतील: सिसोदिया

भाजपने (BJP) गोव्यातील लोकांकडून जाहिरनाम्यासाठी सल्ले मागितले होते. लोकांच्या शिफारशी व सूचनांचा जाहीरनाम्यात समावेश केला असल्याचा दावा भाजप करत आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) भाजप उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. ते सांगे मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुभाष फळदेसाई यांच्या प्रचारासाठी दुपारी 4:30 वाजता सांगे येथे जाहीर सभेत सहभागी होतील. पुढे केपे मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांच्या प्रचारासाठी गडकरी सायंकाळी 5:45 वाजता केपे येथे एका जाहीर सभेला संबोधित करतील. शिरोडा मतदारसंघातील उमेदवार सुभाष शिरोडकर यांच्या प्रचारासाठी सायंकाळी सव्वा सात वाजता गडकरी जाहीर सभा घेणार आहेत. आगामी काळात भाजपच्या प्रचारासाठी अनेक दिग्गज नेते गोव्यात दाखल होणार आहेत. कॉंग्रेसचे नेते सुद्धा गोव्यात जोरदार प्रचार करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com