Goa Tiger Reserve Dainik Gomantak
गोवा

Goa Tiger Reserve: न्यायालयाने निकाल दिला! तरीही मुख्यमंत्री म्हणतात, ''अजून व्याघ्र प्रकल्पावर अभ्यास करायचाय!''

मुख्यमंत्र्यांनी असे वक्तव्य करून सरकारलाही यात किती रस आहे, याचेच दर्शन घडवले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पाचा विषय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अद्याप अभ्यासलाच नाही, असे सांगितले तर क्षणभर ते खरेही वाटणार नाही. मात्र, या विषयाचा अद्याप अभ्यास करायचा आहे, असे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच आज सांगितले.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेवेळी सर्वोच्च न्यायालयाने व्‍याघ्र प्रकल्प तीन महिन्यांत अधिसूचित करा, या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या निकालाला अंतरिम स्थगिती दिली नाहीच, शिवाय ती याचिकाही दाखल करून घेतली नाही, याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

सर्वोच्च न्यायालयाने असे का केले असेल, असे विचारल्यावर ‘या विषयाचा अभ्यास करून सांगतो’ असे एका ओळीचे उत्तर त्यांनी दिले. एऱव्ही कोणताही प्रश्न विचारल्यावर थांबून, प्रश्न विचारण्याकडे पाहात उत्तर देणारे मुख्यमंत्री हे वाक्य तोंडातच पुटपुटत निघून गेले. यावरून त्यांना या विषयात फारसा रस नसल्याचे दिसून येते.

विशेष म्हणजे, उच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर या विषयावर जाहीरपणे भाष्य करणे मुख्यमंत्र्यांनी टाळले. वनमंत्री विश्वजीत राणे यांनी उच्च न्यायालयाचा निकाल आल्यासरशी त्या निवाड्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल, असे जाहीर केले होते.

त्यानंतर आता तशी याचिका (स्पेशल लीव पिटीशन) राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे. ती कामकाजात दाखल करून घेण्याआधी प्रतिवाद्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी न्यायालयाने नोटीसा जारी केल्या आहेत. उच्च न्यायालयातील याचिकादार गोवा फाउंडेशनने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हीएट अर्ज सादर केला होता.

राज्य सरकारची याचिका ऐकून घेणे का आवश्यक आहे, हे सर्वोच्च न्यायालयाला पटवून देण्यासाठी ॲड. मुकुल रोहतगी यांना 45 मिनिटे खर्च करावी लागली. यावरून एकंदरीत खटल्याचे महत्त्व लक्षात येऊ शकते. आता मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करण्याचे वक्तव्य करून सरकारलाही यात किती रस आहे, याचेच दर्शन घडवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT