37th National Games Goa 2023: क्रीडा स्पर्धा तोंडावर, अद्याप केंद्राकडून एक छदाम नाही!

मुख्यमंत्री म्हणतात, केंद्राकडून मदत मिळेल
37th National Games Goa 2023
37th National Games Goa 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

37th National Games Goa 2023 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी केंद्र सरकारने भरीव आर्थिक पाठिंबा द्यावा, यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीवारी केली असली तरी प्रत्यक्षात ऱाज्य सरकारच्या हाती मदतीचा छदामही लागलेला नाही.

मुख्यमंत्र्यांना आज याबाबत विचारले असता त्यांनी केंद्राकडून या स्पर्धेच्या आयोजनासाठी मदत मिळणार आहे, असे त्यांनी मोघमपणे सांगितले.

या स्पर्धेच्या आयोजनासाठी थॉमस कुक या कंपनीला प्रवास, निवास आणि खाद्यपदार्थ पुरवठा यांचे कंत्राट दिल्यावरून ‘आप’ने टीका केली आहे. त्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, बोली उघडल्यानंतर 15 मिनिटांत टीका केली, यावरून त्यांचा उद्देश स्पष्ट होतो.

येथे दोनच बोलीदार होते. मला बोली उघडल्याची माहिती मिळण्याआधीच विरोधकांनी टीका केल्याची माहिती मिळाली. यावरून टीका करण्यासाठी किती घाई केली, हे लक्षात येते. राष्ट्रीय क्रीडा स्‍पर्धांचे आयोजन बऱ्याच कालावधीनंतर एखाद्या ठिकाणी होते.

त्यामुळे दर्जा हा ठेवावाच लागतो. कोणत्या कंपनीला याचे कंत्राट द्यावे, हे ठरवण्यासाठी निकष, नियम आहेत. त्याचे पालन करूनच कंत्राट दिले जाते. मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली आहे. त्यामुळे उद्यापर्यंत कामाचे आदेश जारी केले जातील.

तांत्रिक बाबी, सादरीकरण आणि वित्तीय बोली असे निविदेचे तीन प्रकार असतात. त्यामुळे केवळ वित्तीय बोली हाच निविदा कोणाला द्यावी हे ठरवण्याचा निकष असू शकत नाही. तो एकच मुद्दा घेऊन सरकारवर टीका करणे अनाठायी आहे, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की बीच व्हॉलीबॉल स्पर्धेला सरकारने पुरस्कृत केल्यावरूनही कोणी टीका करू शकेल. अशा आयोजनामुळे पर्यटकांची पावले राज्याकडे वळतात आणि अन्य ठिकाणी गोव्‍याचे नाव होते.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोवा मुक्तीनंतर प्रथमच राज्यात होत आहेत. त्यामुळे त्याचे आयोजन त्या दर्जाचेच होणे आवश्यक आहे. यासाठी थॉमस कुकची निवड त्यासाठी करण्यात आली आहे. या आयोजनासाठी सुविधा विकसित करण्याचे काम सुरू आहे. आता किरकोळ काम बाकी आहे.

37th National Games Goa 2023
Goa Beach Shack Policy बाबत आज होणार बैठक; सुवर्णमध्य काढण्याचे मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान

निवास कुठे?

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी अन्य राज्यांकडून संघाच्या निवासाची व्यवस्था कुठे केली आहे, याची विचारणा होऊ लागली आहे. याचे उत्तर अद्याप सरकारकडे नाही.

ही व्यवस्था थॉमक कूककडे सोपवल्यानंतर ती कंपनी सारे सोपस्कार करेल, याकडे क्रीडा खात्याचे विशेषतः गोवा क्रीडा प्राधिकरणाचे डोळे लागले आहेत. यामुळे सध्या विचारणा करणाऱ्यांना नंतर कळवतो, असे साचेबद्ध उत्तर देण्यात येत आहे.

37th National Games Goa 2023
Goa Farming: राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे खाजन शेती धोक्यात : ‘कॅग’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com