Goa: BJP workers participating in the procession at Kanaka without wearing helmets.
1st September 2021
Goa: BJP workers participating in the procession at Kanaka without wearing helmets. 1st September 2021 Dainik Gomantak
गोवा

Goa: भाजप मिरवणुकीला हेल्मेटचा नियम नाहीच

Sandeep Survekamble

काणका-म्हापसा (Mapusa) येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर शिवोली विधानसभा मतदारसंघात काढण्यात आलेल्या भव्य रॅलीला सहभागी व्यक्तींसाठी हेल्मेट परिधान करण्याचा नियम तिथे वाहतूक पोलिस उपस्थित असतानाही लागूच झाला नाही. (BJP workers participating in the procession at Kanaka without wearing helmets.) त्यामुळे ती मिरवणूक बिनदिक्त मार्गस्थ झाली. त्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या सुमारे पाचशे भाजप (BJP Activist) कार्यकर्त्यांपैकी किमान नव्वद टक्के व्यक्तींनी मुखावरण वापरले नव्हते. काहींनी तर केवळ दाखवण्यापुरतीच मुखावरण (Mask) गळ्यातच अडकवलेले होते. तसेच त्यापैकी कित्येक दुचाकींवर तिघे जण (ट्रिपल सीट) बसलेले होते. ती भव्य मिरवणूक काणका येथे प्रारंभ झाल्यानंतर आसगाव, हणजूण या मार्गे शिवोलीपर्यंत गेली होती. (Many of them had triple seats on two bikes. After the grand procession started at Kanaka, it had reached Shivoli via Asgaon, Hanjun.)

वाहतूक पोलिसांच्या यासंदर्भातील एकंदर भूमिकेबाबत सध्या सर्वसामान्य लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एरवी छोटेसेदेखील कारण शोधून काढून वाहनचालकांना नेहमीच सतावले जाते. पण, मिरवणुकीतील जवळजवळ सर्वच माणसे नियमभंग करीत असल्याचे पाहूनही वाहतूक पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे धैर्य कसे काय दाखवले नाही, असा सवाल लोकांमध्ये उपस्थित केला जात आहे. तो मेळावा काणका बांध येथील श्री सिद्धपुरुष नारायणदेव मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. तो काही शासकीय कार्यक्रम नव्हता, तर पूर्णत: पक्षीय कार्यक्रम होता. त्या सभागृहात सुमारे हजारभर पुरुष व महिला कार्यकर्ते दाटीवाटीने बसलेले होते व कोविडबाबत सामाजिक अंतर पाळण्याचे भानही त्याबाबत कुणीच दाखवले नव्हते.

भाजपचे कार्यकर्ते सभागृहात न बसता मुख्य रस्त्यावर दाटीवाटीने उभे राहिल्याने अन्य लोकांना तेथून रस्ता पार करणे त्रासदायक ठरले होते. वास्तविक, त्या परिसरात वाहनांच्या पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध होती. तरीसुद्धा बहुतांश भाजप कार्यकर्त्यांनी रास्त्याच्या बाजूलाच वाहने पार्क केल्याने एकंदर रहदारीवर मोठा परिणाम झाला. याबाबत वाहतूक पोलिसांनी आवश्यक कारवाई न केल्याने इतर लोकांना त्रास झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

‘या’ देशाच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या, खळबळजनक खुलासा; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

SCROLL FOR NEXT