Goa: आजपासून कदंबची पुणे, मुंबई बससेवा सुरू

कदंब बसमध्ये लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या प्रवाशांना प्रवेश दिला जाणार
Goa Kadamba Corporation
Goa Kadamba CorporationDainik Gomantak

कोविडमुळे (Covid-19) बंद असलेली गोवा कदंब महामंडळाची (Goa Kadamba Corporation) आंतरराज्य मार्गावरील बस सेवा (Bus service) आता टप्याटप्याने सुरू करण्यात येत आहे. या अंतर्गत आज बुधवारपासून मुंबई, पुणे आणि बेंगळुरू (Mumbai, Pune and Bangalore) या तीन महामार्गांवरील कदंब बसच्या फेऱ्या वाढणार आहे. मात्र या बसमध्ये लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या प्रवाशांना प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती कदंब महामंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी दिली. या बस सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांकडून कसा प्रतिसाद मिळतो, यावरून पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

या तिन्ही महामार्गांवर दररोज सायंकाळी पणजी कदंब बसस्थानकातून प्रत्येकी एक बस सुटणार आहे. ती बस सकाळी ठराविक स्थानावर पोहोचेल. त्यानंतर तीच बस सायंकाळी त्या ठिकाणीहून सुटून दुसऱ्या दिवशी पणजीत दाखल होईल. अशाप्रकारे एकूण दोन बसेसचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे, या तिन्ही मार्गांवरून धावणार आहेत.

Goa Kadamba Corporation
Goa Mines सुरू होण्यास केंद्र करणार मदत

दरम्यान दरवर्षी 120 कोटी रुपयाचे सरकारी अनुदान घेणारे कदंब महामंडळ नुकसानीत चालले आहे. त्यातच ‘कोरोना’ संकटामुळे राज्यात सुरू असलेल्या संचारबंदीमुळे कदंब महामंडळाच्या 417 बसेस बंद ठेवाव्या लागल्या होत्या. त्यामुळे कदंब महामंडळाला दररोज 20 लाख रुपये नुकसान झाले होते. आता राज्यात संचारबंदी असली तरी 50 टक्के कदंबच्या बसेस सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे प्रवासी नसल्यामुळे कदंबच्या सध्या फक्त 117 बसेस विविध मार्गावर सुरू होत्या. त्यात आता या तिन बसची भर पडली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com