Police with suspect in ATM theft case in Bicholim (Goa Crime)
Police with suspect in ATM theft case in Bicholim (Goa Crime)Dainik Gomantak

Goa Crime: बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

डिचोलीत संशयित युवकास अटक (Goa Crime)
Published on

Goa Crime: डिचोली शहरातील (Bicholim City) एका राष्ट्रीयकृत बँकेच्या 'एटीएम' मधून पैसे चोरण्याचा प्रयत्न केल्याच्या (ATM Broke) आरोपावरुन डिचोली पोलिसांनी 27 वर्षीय संशयित युवकास अटक केली आहे. मेहबूब हैदर अली शेख असे अटक केलेल्या युवकाचे नाव असून, संशयित युवक मुस्लिमवाडा-डिचोली येथील आहे. उपलब्ध माहितीनुसार बोर्डे येथील युनियन बँकेच्या (Union Bank) एटीएएम मधून मेहबूब याने चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. एटीएममधून पैसे बाहेर पडतात त्याठिकाणी मोहम्मद याने धातूचे पॅनल बसवून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला होता. त्याचे हे कारनामे सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते.

Police with suspect in ATM theft case in Bicholim (Goa Crime)
Goa Ganeshotsav: डिचोलीत या प्रसिद्ध जागेत भरणार यावर्षीचा 'माटोळी बाजार'

याप्रकरणी युनियन बँकेच्या अधिकाऱ्यांनी डिचोली पोलिस स्थानकात तक्रार करताच पोलिस निरीक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून संशयित युवकास मुस्लिमवाडा येथून ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या 380 आणि 511 कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. अन्य एटीएम चोरी प्रकरणात संशयित गुंतला आहे की नाही, त्यादृष्टीने पोलिस तपास चालू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com